Udayanraje Bhosale : 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, मला नगराध्यक्ष व्हायचंय...', उदयनराजे भोसलेंच्या मनात काय?

Satara Palika Election : साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या आघाड्या 'भाजपा'च्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची चिन्हं; ‘मनोमीलन’चा कानमंत्र देत राजे समर्थक तयारीला.
MP Udayanraje Bhosale humorously remarked he’d resign from Parliament to contest for Satara Mayor, stirring local political buzz.
MP Udayanraje Bhosale humorously remarked he’d resign from Parliament to contest for Satara Mayor, stirring local political buzz.Sarkarnama
Published on
Updated on

Satara Politics Mayor Election : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार की मैत्रीपुर्ण लढत होणार याची चर्चा सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी धक्कादायक विधान केले आहे. 'मलाही नगराध्यक्ष व्हायची इच्छा होती त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, मला नगराध्यक्ष व्हायचं आहे.', असे उदयनराजे म्हणाले.

MP Udayanraje Bhosale humorously remarked he’d resign from Parliament to contest for Satara Mayor, stirring local political buzz.
Satara Politic's : उदयनराजेंसोबत एकत्र येण्याबाबत शिवेंद्रराजेंचे मोठे विधान : ‘आम्ही दोघंही भाजपमध्ये...’

उदयनराजेंच्या या वक्तव्यामुळे सातारच्या राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, उदयनराजे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे मिश्किलपणे केलेली टिपण्णी आहे, असे बोलले जात आहे. कारण हे वक्तव्य करताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू देखील होते.

सातारा पालिकेवर भाजप विरुद्ध इतर अशी लढत होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या स्थानिक पातळीवरील आघाड्या या एकमेकांच्या विरोधात लढतात असा येथील इतिहास आहे. मात्र, विधानसभा, लोकसभा निवडणूकी पासून दोनही राजे भाजपात आल्याने आणि या पालिका निवडणूकीत पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या चिन्हाचा आग्रह धरल्याने दोन्ही आघाड्या 'भाजपा'च्या नेतृत्वात एकत्र लढणार असल्याचे चित्र आहे. उदयनराजेंनी आपल्या समर्थकांना मनोमीलनाची काळजी करु नका, असा कानमंत्र देत कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत.

MP Udayanraje Bhosale humorously remarked he’d resign from Parliament to contest for Satara Mayor, stirring local political buzz.
Shashikant Shinde vs Shivendraraje : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरविणाऱ्या गटासाठी 'टाईट फिल्डिंग'; शशिकांत शिंदे विरुद्ध शिवेंद्रराजेमध्ये 'कांटे की टक्कर'

'साविआ'-'नविआ'तील सत्तासंघर्ष

सातारा पालिकेत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी व शिवेंद्रराजेंच्या नगर विकास आघाडीशी लढत होत होती. मात्र, आता या दोन्ही आघाड्या एकत्र येत भाजपच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे भाजपचा (BJP) नगराध्यक्ष होण्याचे चित्र स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांकडून आपल्याला किती जागा मिळणार याचा अंदाज घेत आपापल्या पद्धतीने प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे.

MP Udayanraje Bhosale humorously remarked he’d resign from Parliament to contest for Satara Mayor, stirring local political buzz.
Satara Palika : उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या आघाडींपुढे 'महाविकास'चे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com