Satara Politic's : उदयनराजेंसोबत एकत्र येण्याबाबत शिवेंद्रराजेंचे मोठे विधान : ‘आम्ही दोघंही भाजपमध्ये...’

Shivendraraje Bhosale Statement : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी भाजपच्या निर्णयानुसारच वाटचाल केली जाईल. जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्याशी चर्चा होईल.
Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-
Udayanraje Bhosale-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on
  1. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप पक्षपातळीवर निर्णय घेईल आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा होईल.

  2. त्यांनी सांगितले की सातारा जिल्ह्याला महायुती सरकारकडून भरपूर निधी मिळत आहे आणि साताऱ्याला ‘सिंगापूर’ करण्याची गरज नाही, तर त्याचे सौंदर्य राखून विकास करावा.

  3. काम करणारे, जबाबदार नगरसेवक आणि नगराध्यक्षच पुढे यावेत, निधीचा वापर नीटनेटका व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Satara, 27 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. मी आणि खासदार उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षात आहोत. पक्षपातळीवर जो निर्णय होईल, त्यादृष्टीने वाटचाल होईल. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्याशीही चर्चा केली जाईल आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले जातील, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात मांडली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पॅनेल आमने सामने होते. आताही दोन्ही राजे हे भाजपत असून जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत एकत्र येणार का, याची प्रचंड उत्सुकता सातारा जिल्ह्याला आहे. त्या संदर्भात बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी आपली भूमिका मांडली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय बैठकीनंतर मंत्री भोसले यांनी आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला भरभरून दिलंय. सातारा पालिकेला यापुढील काळातही जास्तीत जास्त निधी मिळेल. फक्त बिल काढण्यासाठी नगरसेवक नसावा. साताऱ्याचा साताराच राहावा, त्याचे सिंगापूर करायची काही गरज नाही, आपला सातारा आहे, तो चांगला करूया, अशी स्पष्टोक्ती बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंनी (Shivendra Raje Bhosale) दिली.

नगरसेवक अथवा नगराध्यक्षपद पदांना न्याय देतील, अशांनाच संधी दिली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी शहरासाठी काम करणारा नगरसेवक हवा. निवडून आल्यानंतर त्याने पाच वर्षे चांगले काम केले पाहिजे. राज्यातून आम्ही निधी आणू. आपलं सरकारने असल्याने निधीही येईल. मात्र, निधी खर्च करताना नीटनेटके नियोजन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री भोसले यांनी बोलून दाखवली.

Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या टार्गेटवर आता विशाल पाटील; ‘तुमचा जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचावाच लागेल’

मंत्री भोसले म्हणाले, माझा वॉर्ड, माझी गल्ली आणि गटाराचे काम असे बघणारे लोक नगरपालिकेत नसावेत. आज सरकार आपलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याला भरपूर निधी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे भूमिपूत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूर्वीपासूनच साताऱ्यावर लक्ष राहिले आहे. त्यामुळे आपल्याला चांगली संधी आहे. आपण घेण्याची मानसिकता बाळगणे गरजेचे आहे.

Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale-
Congress News : काँग्रेसमध्ये काहीतरी घडतंय...बिघडतंय; प्रदेशाध्यक्ष सपकाळ तातडीने पोचले नितीन राऊतांच्या भेटीला, चर्चांना उधाण!

1. शिवेंद्रराजे भोसले यांनी निवडणुकांबाबत काय भूमिका मांडली?
भाजप पक्षपातळीवर निर्णय घेईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

2. साताऱ्याच्या विकासाबाबत त्यांनी काय मत व्यक्त केले?
सातारा सुंदर आहे, त्याला ‘सिंगापूर’ करण्याची गरज नाही, तर नियोजनबद्ध विकास करावा, असे त्यांनी म्हटले.

3. उमेदवार निवडताना त्यांनी कोणते निकष मांडले?
शहरासाठी प्रामाणिकपणे काम करणारे आणि जबाबदार लोकच उमेदवार असावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

4. साताऱ्याला सरकारकडून काय मिळाले आहे?
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला भरपूर निधी दिला असून आणखी निधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com