Udayanraje Bhosale News : उदयनराजेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, मी काय संन्यास घेणार नाही, लढणारच...

Political News : माझ्याकडे तिकीट आहेत ना, प्लेनचे, ट्रेनचे, पिक्चरचे आणि बसचेही तिकीट आहेत. बाकीच्या तिकिटांचं मला माहिती नाही. ज्यावेळी ठरवतील त्यावेळी बघू, असे उत्तर उदयनराजेंनी दिले.
Udayanraje Bhosale on Retirement
Udayanraje Bhosale on Retirement Sarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट वाटपाचा घोळ सुरू आहे. अनेकजण नाराज आहेत. पण, या सर्व पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंनी मात्र अगदी मिश्किलपणे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझ्याकडे तिकीट आहेत ना, प्लेनचे, ट्रेनचे, पिक्चरचे आणि बसचेही तिकीट आहेत. बाकीच्या तिकिटांचं मला माहिती नाही. ज्यावेळी ठरवतील त्यावेळी बघू, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच ‘मी काही संन्यास घेणार नाही, लढणारच,’ असेही त्यांनी नमूद केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा महायुतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पहिल्या दोन यादीत उदयनराजेंचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी उदयनराजेंनाच तिकीट मिळावे, अशी मागणी लावून धरली असून, प्रसंगी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. (Udayanraje Bhosale News )

Udayanraje Bhosale on Retirement
Murlidhar Mohol News : दशकांचे वितुष्ट संपुष्टात; मोहोळांनी घेतली मेधा कुलकर्णींची भेट

या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाचे लोकार्पण खासदार उदयनराजेंच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

सातारा लोकसभेच्या जागावाटपाचा घोळ सुरू आहे. अनेकजण तिकीट मिळेल की नाही यावरून नाराज आहेत. याबाबत तुम्हाला तिकीट मिळणार का, या प्रश्नावर उदयनराजेंनी अगदी मिश्किलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्याकडे प्लेनचे, ट्रेनचे, पिक्चरचे आणि बसचे तिकीट आहे.

बाकीच्या तिकिटांचं मला माहिती नाही. ज्या वेळी ठरवतील त्यावेळी बघू, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून मिळेल की नाही, यावर उदयनराजे म्हणाले, यावर आताच बोलणं उचित ठरणार नाही. कारण महायुतीत तीन पक्ष एकत्र आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांना वाटते की आपल्यालाच तिकीट मिळावे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde) असतील. प्रत्येकाची इच्छा असते. यामध्ये वेगळे काहीही नाही. मग पुढं काय निर्णय असेल, यावर उदयनराजे म्हणाले, मी काय संन्यास घेणार नाही, लढणारच,असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Udayanraje Bhosale on Retirement
Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी घेतले काँग्रेसच्या प्रतापराव भोसलेंचे आशीर्वाद ; काय आहे कारण ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com