
Sanjay Raut
Sarkarnama
मुंबई : ''अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे हिंदुत्ववादी (Hinduttva) होते, पण ते धर्मांध नव्हते. हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीही तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे. देशाची एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन त्यांनी नेहमी राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता यांना दूर ठेवूनही राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं,'' अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
आज दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांनी अटलबिगहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. ''हा देश सर्वांचा आहे. देशातील एकात्मता टिकली पाहिजे, याच भावनेने ते नेहमी काम करत होते. त्यामुळे देशातील जनता अटलबिहारी वाजपेयींकडे एका पक्षाचा नेता नव्हे तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून पाहते. असही त्यांनी स्पष्ट केलं. तर, 'सबका साथ सबका विकास' हे त्यांनाच शोभतं,' असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
" अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेची युती झाली. त्यात अटल बिहारी वाजपेयी यांचं मोठं योगदान होतं. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. आपल्या हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. 'हिंदू अब मार नही खाएगा', असेही त्यांनी ठणकावून सांगितले. पण त्याचा अर्थ 'कोई और मार खाएगा', असाही नव्हता.
दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हेच देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले. पण आताच्या काळात अटलजींच्या विचारांची विटंबना होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.