Chandrapur News: दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar News) यांना चंद्रपूर-आर्णी लोकसभेची (Chandrapur Lok Sabha Election 2024) उमेदवारी देण्यात यावी, यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले. मारेगाव व वणी तालुक्यातील अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांना फोन करून तिकीटची मागणी केली आहे. त्यांचे ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऐनवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर-आर्णी लोकसभेसाठी चर्चेत आल्याने मतदारसंघातून नाराजीचा सूर उमटत आहे. पण, काँग्रेस हायकमांड आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याची माहिती आहे. सुरुवातीला प्रतिभा धानोरकरांचे नाव मागे पडले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार प्रतिभा धानोरकर या धनोजे कुणबी मराठा समाजातील आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात धनोजे कुणबी मराठा समाजाच्या मतदानांची टक्केवारी मोठी आहेत. त्यात धानोरकरांच्या मागे सहानुभूतीची लाट असल्याने काल सायंकाळी प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) की शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) अशी चर्चा दोन दिवसांपासून रंगली होती. अशातच प्रतिभा धानोरकरांनी ट्विट करून आपल्या उमेदवारीवर दावा केला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिभा धानोरकर यांनी मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या टि्वटमुळे चंद्रपूरचे राजकारण तापलं. धानोरकरांच्या दाव्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांना संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती.
आज काळ आणि वेळ बदलली असली तरी परिस्थिती बदलली नाही. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांनी थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर मैदान गाजवायचं आहे, असे टि्वट धानोरकरांनी केले होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.