Satara Loksabha Election 2024 : कराड दक्षिण कोणाच्या बाजूनं? उदयनराजे अन् शिंदेंची झोप उडाली

Lok Sabha Election Result 2024 : कऱ्हाड दक्षिण हा नेहमीच कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे उदयनराजे ज्यावेळी राष्‍ट्रवादीतून निवडणूक लढले त्यावेळी त्यांना कऱ्हाड दक्षिणने मताधिक्य दिले आहे.
Udayanaraje Bhosle Shashikant Shinde
Udayanaraje Bhosle Shashikant ShindeSarkarnama

सचिन देशमुख

Karad South Constituency : काँग्रेसचा एकमेव बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड दक्षिणमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. आजपर्यंत या मतदारसंघाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचीच पाठराखण करत मताधिक्य दिले. त्यामुळे हा मतदारसंघ या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहणार की, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची साथ धरणार, हे उद्याच्या निकालात स्पष्‍ट होईल.

महाआघाडीचे उमेदवार शिंदे यांच्या मताधिक्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते तर महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या मताधिक्यासाठी भाजपचे (BJP) अतुल भोसले, शिवसेना (एकनाथ शिंदे) राजेंद्र यादव, विक्रम पावसकर आदी नेतेमंडळींनी जीवाचे रान केले आहे. त्यांच्या या कष्‍टाला कितीपत यश येणार? हे उद्या समजणार आहे.

कऱ्हाड लोकसभा मतदारसंघ असताना असो किंवा लोकसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेत साताऱ्यात कऱ्हाडचा समावेश झाल्यावर असो, कऱ्हाड दक्षिण हा नेहमीच कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे उदयनराजे ज्यावेळी राष्‍ट्रवादीतून निवडणूक लढले त्यावेळी त्यांना कऱ्हाड दक्षिणने मताधिक्य दिले आहे. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भाजपमधून लढले तर, श्रीनिवास पाटील राष्‍ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी कऱ्हाड दक्षिणमधून पाटील यांचे मताधिक्य 31 हजार 849 दिले होते. त्यात महाआघाडीचे जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. ते ही कऱ्हाडमध्येच!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि कऱ्हाड दक्षिणचे पृथ्वीराज चव्हाण विद्यमान आमदार असल्याने मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे. त्यात महाआघाडीची कऱ्हाड उत्तरपेक्षा दक्षिणमध्ये ताकद अधिक एकवटल्याचे दिसून आले. त्यात आमदार चव्हाण यांनी शशिकांत शिंदे सुमारे दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा करत आहेत. त्यात कऱ्हाड दक्षिणचा वाटा सर्वाधिक राहणार असल्याचे बोलले जाते.

Udayanaraje Bhosle Shashikant Shinde
Satara Lok Sabha Election 2024 : कराड उत्तर मधून शिंदेंचे मताधिक्य वाढणार की उदयनराजेंची सरशी होणार ?

मात्र, कऱ्हाड दक्षिणमधील काँग्रेसचे प्राबल्य व उदयनराजेंबद्दल असलेली नाराजी विचारात घेवून भाजपने पहिल्यापासूनच या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठी उदयनराजेंचा बहुतांश वेळ कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि कऱ्हाड उत्तरमध्ये दिल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभाही कऱ्हाडमध्येच घेण्यात आली होती. त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडला, हे निकालातून कळेल. अतुल भोसले यांनी या मतदारसंघात भाजपची बाजू लावून धरली. त्यासाठी त्यांना राजेंद्र यादव, एकनाथ बागडी यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांची साथ मिळाली आहे. मात्र, त्यांच्या शब्दाला कऱ्हाड दक्षिणच्या मतदारांनी कितपत मान दिला, हे मतमोजणीनंतर स्पष्‍ट होईल.

Udayanaraje Bhosle Shashikant Shinde
Prithviraj Chavan to Election Commission : एक्झिट पोलचे आकडे कानावर आले अन् चव्हाणांकडून 'इलेक्शन कमिशन'ला नवा सल्ला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com