Satara Lok Sabha Election 2024 : कराड उत्तर मधून शिंदेंचे मताधिक्य वाढणार की उदयनराजेंची सरशी होणार ?

Karad North Constituency: कराड उत्तर मधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळणार याची उत्सुकता असून अपेक्षित निकालासाठी दोन्ही उमेदवारांच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत.
Satara Lok Sabha Election 2024
Satara Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

अविनाश काशीद

Karad News : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व आहे. आजपर्यंत या मतदारसंघाने यशवंत विचारांना साथ दिली आहे. अर्थातच या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. आत यावेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळणार याची उत्सुकता असून अपेक्षित निकालासाठी दोन्ही उमेदवारांच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत. शशिकांत शिंदेंचे मताधिक्य वाढणार की उदयनराजेंमुळे मताधिक्य घटणार याची उत्सुकता आहे.  

सातारा लोकसभा मतदारसंघात कराड उत्तर मतदारसंघाने आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारांची पाठराखण करत मताधिक्य दिलेले आहे. या मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मताधिक्य देण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. तर महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी यांनी राष्ट्रीय/राज्य व स्थानिक मुद्द्यांवर घर टु घर, कोपरा सभा, प्रचार सभांच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला आहे. 

याउलट आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदेंचे मताधिक्य वाढणार की उदयनराजेंमुळे ते कमी होणार याची उत्सुकता आहे. निकालासाठी अवघे १२ तास उरलेले असताना या मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांत शांततेचे वातावरण आहे. 

निवडणुकीच्या निकालापूर्वीच्या म्हणजेच वादळापूर्वीची ही शांतता मानली जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात आजपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत. नव्याने जुळलेली राजकीय समीकरणे निभावताना सर्वच पक्षांच्या प्रमुखांचा आता कस लागणार आहे. साताराकरांनी नव्याने निर्माण झालेल्या राजकीय गणितांमध्ये केलेली बेरीज-वजाबाकी उद्या (मंगळवारी) स्पष्ट होणार आहे.

Satara Lok Sabha Election 2024
MVA Vs Mahayuti : एक्झिट पोल खोटा! राज्यात आम्हीच 'किंग'; महायुती अन् आघाडीला भलताच कॉन्फिडन्स..

त्यामुळे आता सर्वांनाच आजच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष करण्याची तयारी केली आहे. गुलाल आमचाच, असा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालाची घाई झाल्याचे यावरून दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com