उदयनराजेंनी घेतली रामराजेंची दुसऱ्यांदा भेट; दिवाळीच्या शुभेच्छा अन्‌ तासभर खोलीबंद चर्चा

दिवाळीच्या शुभेच्छांचे निमित्त, तासभर खोलीबंद चर्चा, संजीवराजे, दिलीपसिंह भोसलेंचीही घेतली भेट
Udayanraje Bhosale, Ramraje naik Nimbalkar
Udayanraje Bhosale, Ramraje naik Nimbalkarphaltan reporter

सातारा : जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घ्यावे, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील सर्व मतभेद विसरुन भेटीगाठीचे सत्र सुरु ठेवले आहे. आज त्यांनी फलटणमध्ये जाऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ड्रायफ्रुटचे गिफ्ट दिले. त्यानंतर दोघांनी तासभर बंद खोलीत चर्चा केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसात उदयनराजेंनी सुरु केलेले हे भेटीचे सत्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भूमिका बदलण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून निवडणुक लढणारे फलटणचे नेते दिलीपसिंह भोसले यांची भेट घेतली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. यामध्ये केंद्रस्थानीखासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आहेत. एकीकडे उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी करुन घेण्याचा मुद्दा तर दुसरीकडे आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंना होणारा विरोध आणि पाच जागांची मागणी यावरच सध्या चर्चेचा खल सुरु आहे.

Udayanraje Bhosale, Ramraje naik Nimbalkar
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

खासदार उदयनराजेंना जिल्हा बॅंकेत सर्वसामान्य शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी संचालक व्हायचे आहे. तर शिवेंद्रसिंहराजेंना त्यांना मागील निवडणुकांतील बदलाया निवडणूकीत सर्वसामान्य संचालक त्यांच्या विरोधात निवडून आणून घ्यायचा आहे. ही वस्तुस्थिती असली तरीखासदार उदयनराजेंनी मागील सर्व मतभेद विसरुन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी भेटीचे सत्र सुरु ठेवले आहे. यापूर्वी ज्या विश्रामगृहात या दोन नेत्यांत संघर्षाची बिजे रोवली होती. त्याच विश्रामगृहात दोघांत जिल्हा बॅंकेत सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह सुरु आहे.

Udayanraje Bhosale, Ramraje naik Nimbalkar
संघर्ष मला नवीन नाही, कोणालाही घाबरु नका : शिवेंद्रसिंहराजे

सभापती रामराजेंनी त्यांचा निर्णय आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवून या दोघांतील कलगीतूरा पेटवून दिलेला आहे. त्यातून उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा संघर्ष जिल्हा बॅंक आणि आगामी सातारा पालिका निवडणुकीसाठी सुरु आहे. काल जिल्हा बॅंकेत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करावा, त्याला साताऱ्यातील सर्व मते आम्ही देऊ असे सूचक इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज फलटणमध्ये जाऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Udayanraje Bhosale, Ramraje naik Nimbalkar
खासदार उदयनराजे राष्ट्रवादीचे चक्रव्यूह भेदणार...?

यावेळी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच ड्रायफ्रूटचे पॅकेटही दिले. तसेच दोघा नेत्यांनी तासभर कमराबंद चर्चा ही केली. त्यांच्यात जिल्हा बॅंकेत सामावून घेण्याबाबतच चर्चा झाली. अधिक तपशील समजू शकलेला नाही. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमावेत माजी सभापती सुनील काटकर उपस्थित होते.

Udayanraje Bhosale, Ramraje naik Nimbalkar
गृहनिर्माण संस्थांच्या एजीएम व ऑडिटला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

तसेच गृहनिर्माण मतदारसंघातून फलटणमधून अर्ज भरलेले दिलीपसिंह भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा उदयनराजेंनी दिल्या. खासदार उदयनराजेंचे हे भेटीचे राजकारण जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने असले तरी राष्ट्रवादीचे सर्व नेते त्यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच करणार आहेत. त्यामुळे येत्या दोनदिवसात याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com