Udayanraje On Indira Gandhi : इंदिरा गांधी यांच्यावर खासदार उदयनराजेंचा गंभीर आरोप; म्हणाले...!

Karad Lok Sabha Constituency : राज्यातील महाविकास आघाडीऐवजी ती महाभकास आघाडी आहे. महाविकास आघाडीत नियोजनाचा अभाव आहे. देशाला स्थिर सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाले..
Udayanraje - Indira Gandhi
Udayanraje - Indira GandhiSarkarnama

हेमंत पवार

Karad Udayanraje News : काँग्रेसच्या काळात गरिबी हटाव, देश बचाव अशा घोषणा झाल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. जगभरात देशाचा नावलौकिक त्यांनी वाढवला. संविधान बदलणार अशी देशात सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, संविधानाचा खात्मा करण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन केली, असा आरोप महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समोरच केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड (Karad) (जि.सातरा) येथे जाहीर प्रचार सभा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समतेचे, लोककल्याणाचे विचार, त्यांना अभिप्रेत असणारा संकल्प वास्तवात उतरण्याचे काम पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले, असे सांगून खासदार भोसले म्हणाले, देशात, राज्यात काँग्रेसचे सरकार होते आणि दोनच भाजपचे खासदार होते.आज देशात सर्वाधिक मोठा पक्ष भाजप बनला आहे. कॉंग्रेसच्या काळात गरिबी हटाव, देश बचाव अशा घोषणा झाल्या. मात्र त्याची अंमलबजावणी अंमलबाजवणी नरेंद्र मोदी यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje - Indira Gandhi
Mahayuti Seat Distrubution : महायुतीचे अखेर ठरलं; उरलेल्या 6 जागा मिळणार 'या' पक्षाला ?

जगभरात आज देशाचा नावलौकिक त्यांनी वाढवला आहे. संविधान बदलणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, संविधानाचा खात्मा करण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी आणीबाणी लागू करून केली. सध्या इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून वादविवाद होतात. राज्यातील महाविकास आघाडीऐवजी ती महाभकास आघाडी आहे. महाविकास आघाडीत नियोजनचा अभाव आहे. देशाला स्थिर सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटनावर भर देणार आहोत. जसे बुद्ध सर्किट आहे, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोहाेचवण्यासाठी राजगड, रायगड आणि सातारा जोडण्यासाठी एक स्वराज्य सर्किट उभे करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

R

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप सतत केला जात आहे. यावर देखील उदयनराजेंनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, विकासकामांच्या बाबतीत बोलता येत नाही तेव्हा विरोधक संविधान बदलणार असे आरोप करतात. कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे बदलायची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या समितीने उत्कृष्ट संविधान बनवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार करून संविधान बनवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

(Edited by : Chaitanya Machale)

Udayanraje - Indira Gandhi
Narendra Modi News : भटकत्या आत्म्यामुळं राज्यात अस्थिरता; PM मोदींचा नेमका रोख कुणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com