Udayanraje on Sharad Pawar : भारतरत्न देण्यावरुन उदयनराजेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, मी यशवंतराव चव्हाणांचा...

Satara MP Udayanraje Bhosale : आज मात्र प्रत्येक जण व्यक्ती केंद्रीत झाला आहे. हे असंच होत राहिलं तर एक काळ सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.
Udayanraje, Sharad Pawar
Udayanraje, Sharad PawarSarkarnama

Satara Political News : यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे याची मागणी मी केली नाही. त्यामुळे विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. यासाठी एक समिती असते. ज्या लोकांनी राजकारणाला दिशा देण्याचे काम केले, त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे.

मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही ? असा टोला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार Sharad Pawar यांचे नाव न घेता लगावला.

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार भोसले Udayanraje यांचे शनिवारी कऱ्हाड शहरात जल्लोषात स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजीसह फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दत्त चौकातून प्रीतिसंगमापर्यंत त्यांची पारंपरिक वाद्यासह डीजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.

लोकं व्यक्ती केंद्रीत झाल्यानेच समाजात फूट पडल्याकडेही उदयनराजेंनी लक्ष वेधले. पूर्वी कामावरून जातपात ठरली, अजूनही 21 व्या शतकात आपण याच गप्पा मारणार ? कुठलं ओबीसी, कोण ओबीसी, कोण मराठा, कोण ब्राह्मण या वादामुळे सगळी सुरुवात झाली. अपघात झाल्यावर लोक कोणाचे रक्त आहे, हे बघतात का ? लोक स्वतः पेक्षा समाजाला केंद्रबिंदू मानून काम करत होते.

Udayanraje, Sharad Pawar
NEET Paper Leak Controversy : केंद्र सरकारची मोठी कारवाई ; 'NTA' महासंचालक सुबोध कुमार यांची हकालपट्टी!

आज मात्र प्रत्येक जण व्यक्ती केंद्रीत झाला आहे. वैयक्तीक स्वार्थ साधण्यासाठी समाजात फूट दरी पडली तरी त्यांना काही देणंघेणं नाही. हे असंच होत राहिलं तर एक काळ सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यावेळी 'लॉ ऑफ द जंगल' येईल, तेव्हा कोण कुत्र कोणाला विचारणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार भोसले यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, राजेंद्र यादव, विजयसिंह यादव, धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मनसेचे दादा शिंगण यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Udayanraje, Sharad Pawar
Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलप्रकरणी भाजप नेत्याच्या अडचणी वाढणार; आरोपपत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com