Satara APMC News : बाजार समितीतील उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढणार; स्वाभिमानी'च्या पाठीशी उदयनराजेंची ताकत

Raju Shetty बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासाची मंदीरे न ठरता शेतकऱ्यांना लुटणारी कत्तलखाने झाले आहेत, असेही शेट्टी म्हणाले.
Raju Shetty, Udayanraje Bhosale
Raju Shetty, Udayanraje Bhosalesarkarnama

Satara APMC News : सातारा बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकरी, व्यापारी, हमाल, दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे. हे पॅनेल निवडून आल्यानंतर बाजार समितीत उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढू. उदयनराजेंशी Udayanraje Bhosale माझे मैत्रीचे संबंध असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच आमची बाजू घेतात. त्यामुळे स्वाभिमानीच्या पॅनेलच्या पाठीशी उदयनराजेंची ताकत राहिल, असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetty यांनी व्यक्त केले.

सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले, बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकरी, व्यापारी, हमाल, दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे.

हे पॅनेल निवडून आल्यानंतर बाजार समितीत उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढून शेतकरी व व्यापाऱ्यांना मोकळीक दिली जाईल. ही निवडणूक लढवत असताना आमच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. त्रास दिला गेला पण, आम्ही लढणारी माणसे असून रडणारी नाही. कार्यकर्त्यांनी कोणाच्यास धमक्यांना भीक घातली नाही.

Raju Shetty, Udayanraje Bhosale
Raju Shetty News : एकरकमी 'एफआरपी'वर सुनावणी होईना; राजू शेट्टींच्या नाराजीची दखल कोण घेणार ?

बोगस दाखल्याबाबत राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बोगस दाखला दिला जातो. तुमच्या जिल्ह्यात दोन दिवसांसाठी दाखले देण्याची नवीन पध्दत आली आहे का. असे होत असेल तर त्याचे दरही आम्हाला सांगा.असले प्रकार सुरु असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. याविरोधात आवाज उठवू.

Raju Shetty, Udayanraje Bhosale
Karad APMC News : कराडला कॉंग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी-भाजप युती; पाटील, चव्हाण आमनेसामने

बैल बाजार आरक्षण असलेल्या जागेवर व्यापाऱ्यांचे गोडावून दिसत आहेत. बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासाची मंदीरे न ठरता शेतकऱ्यांना लुटणारी कत्तलखाने झाले आहेत. जनावरे विकायची कुठे, त्या जागेवरील आरक्षण रद्द केली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सातारा बाजार समिती शेतकऱ्यांच्या राजकारणांचा आड्डा नव्हे शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून चांगली भूमिका घेऊन आम्ही रिंगणात उतरलो आहोत.

Raju Shetty, Udayanraje Bhosale
Udayanraje News; राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे!

त्यामुळे मतदारांनी ही कोणाच्या दडपशाहीला बळी न पडता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलला मतदान करावे. तहसिलदारांनी दिलेला दाखला बदलला जातो. तो बोगस दाखला दिलाच का, रद्द केलेल्या दाखल्यावर आणि नवीन दिलेल्या दाखल्याच्या पत्रावर तहसिलदार सही करतो. असा प्रकार करणाऱ्या या तहसिलदारावर कारवाई करणार का. मुख्यमंत्री काही कालावधीसाठी तुमच्या जिल्ह्यात दाखले मिळतात का, याची काही किंमत असेल तर मुख्यमत्र्यांनी सांगावी, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.

Raju Shetty, Udayanraje Bhosale
Satara News : 'महाविकास'च्या सभातून विरोधकांचे वस्त्रहरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन...राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com