Yuvasena : गाडीवर पोलीस, आर्मी अन् महाराष्ट्र शासन, आत्तातरी पोलीस जागे होणार का? युवासेना आक्रमक

Yuvasena On Kolhapur Police : महाराष्ट्र शासन, प्रेस, VIP, आर्मी, पोलीस व इतर संघटनांच्या स्वयंघोषित अधिकाऱ्यांच्या नावाच्या प्लेट लावून गाड्या रस्त्यांवर फिरत आहेत.
Yuvasena On Kolhapur Police
Yuvasena On Kolhapur PoliceSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : सध्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या वाहनावर आर्मी, पोलीस, प्रेस आणि महाराष्ट्र शासन असे आनाधिकृत पणे लिहून बेसिस्त वाहन पार्किंग केली जात आहे. यामुळे आता अशा वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाने वचक बसवून कार्यवाई करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामागणीसाठी युवासेनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शहरातील लोकसंख्येसह दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. अशातच काही महाभागांची वर्दळ देखील शहरात वाढलेली आहे. जे आपल्या वाहणांवर महाराष्ट्र शासन, प्रेस, VIP, आर्मी, पोलीस व इतर संघटनांच्या स्वयंघोषित अधिकाऱ्यांच्या नाव लिहतात. या कार चालकांची किंवा दूचाकीस्वारांची वाहतूक पोलिसांकडून कोणतीच चौकशी केली जात नाही.

परिणामी काही वेळा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा महाभागांना आवरावे, त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी युवा सेनेने आज (ता.18) आक्रमक पवित्रा घेतला. यामागणीचे याबाबतचे निवेदन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.

पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोल्हापूर शहरांमध्ये आर्मी, पोलीस, प्रेस आणि महाराष्ट्र शासन असे आनाधिकृत पणे लिहलेल्या गाड्या राजरोसपणे फिरतात. अशा वाहनांवर भीतीपोटी वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.

Yuvasena On Kolhapur Police
Chandrapur Yuvasena News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा वाहनातून संबंधित व्यक्तीच फिरतात का? याची खातरजमा करणे गरजेची आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी, तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्रतेने करावी, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माने यांनी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्याकडे केली आहे.

तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी जर अशा गाड्यांच्या तपासणीची अचानक मोहीम उघडली तर यातल्या बहुतांशी गाड्यांमध्ये संबंधित व्यक्ती न बसता त्या व्यक्तीचे नातेवाईक अथवा इतर तोतया व्यक्ती असल्याचे उघडकीस येईल. सर्वसामान्य व्यक्तीवर ताबडतोब कारवाईचा बडगा उगारण्यासाठी प्रशासन तत्पर असते.

Yuvasena On Kolhapur Police
Aditya Thackeray यांना धक्का ; जवळचा सहकारी दुरावणार | Rahul kanal shinde group| Shivsena |Yuvasena

परंतु आपल्या नातेवाईकांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने अधिकृत केलेल्या गाड्यांच्या मधून फिरणाऱ्या या VIP च्या नातेवाईकांचा भांडाफोड व्हायला वेळ लागणार नाही. तर अशी फिरणारी काही वेळा धोकादायक ही ठरू शकतात, अशी शक्यताही युवासेनेने व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com