Satara Politics| आधी तुमच्या पराभवाची कारणं दया; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

Satara Politics| ज्या मध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असते, त्यालाच निवडणुका म्हणतात.
Shivendraraje Bhosale| Udayanraje bhosale
Shivendraraje Bhosale| Udayanraje bhosale

सातारा : ''ज्या मध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असते, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्विकारला आहे. तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हुरळुनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारण तोंड वर करून विचारताय तर आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं दया, ती जी कारण असतील तीच आमची समजा, बॅंक कायदेशीर मर्ज केली ती जी कारण असतील तीच आमची समजा, असा सडेतोड पलटवार करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

तसेच, बॅंक कायदेशीर मर्ज केली असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बॅंक स्थापन केली होती का? एक बॅंक तुमच्या अंदाधुंद भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली पण त्याकरीता दुस-या बॅंकेचाही गळा घोटला, सहकारी बझारचे रेस्टॉरंट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही. परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे. आ. शिवेंद्रराजे यांनी खा.उदयनराजे टीका केली होती. या टीकेला खा.उदयनराजे यांनी उत्तर दिले आहे.

Shivendraraje Bhosale| Udayanraje bhosale
नंदुरबारमध्ये शिवसेनेला डबल धक्का; चंद्रकांत रघुवंशी एकनाथ शिंदे गटात

उदयनराजे म्हणाले, ''आमचा आणि तुमचा मार्ग बगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उदिष्ट देखिल वेगळे आहे. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, जनतेला जनार्दन समजतो. आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंवा कार्यकर्त्यांचे विक पॉईंट हेरून त्यांच्या नाड्या आवळता जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यमुळे आहे अशी भावना तुमची सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची धारणा असा जो काही फरक आहे तो मुलभूत फरक आहे. त्यामुळे दोषांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा वेगळी आहे. दुस-याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहंमन्य देखील समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होता हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहात.

Shivendraraje Bhosale| Udayanraje bhosale
शिवसेनेला सोलापूरात पुन्हा धक्का; शहाजीबापू पाठोपाठ कोकाटे अन् क्षीरसागरही शिंदे गटात

अजिंक्यतारा कारखाना लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेवून तुम्ही आमच्याकडे आला होता. लक्ष घालू नका. मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो असे देखिल म्हणाला होता है इतक्या लवकर कसे विसरलात? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो तर तुमची छाती जामून, नुसत्या वरकडया राहतील याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे पहा.

तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शोध तुम्ही लावलेला आहे ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे. उदयनराजे भोसले म्हणाले की, आम्ही ज्यावेळी एकादा प्रकल्प अंतिम टप्यात येतो त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह आम्ही माहीती देत असतो. तुमच्या सारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे आला, त्याचा फोटा आणि बातमी, आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो, आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी आणि यांचा फोटो. परंतु अन्य महोदयांकडे असेल तर मात्र यांना तेथे कोणी विचारतच नाही त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे तर फक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभून दिसतो. हा फरक सुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे.

सातारा-कराड हे जंक्शन नाही त्यामुळे बेधुन गाडी सुरु करता येत नाही याचे देखिल यांना भान नाही, उचल जीम लाब टाळयाला असा यांचा एकंदरीत नखरा आहे. प्लॅटफॉर्म नांगी, प्लॅटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दुहरीकरण, विद्युतीकरण प्रवाश्यांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी काम केली आहेत. १०-१२ वर्षांपूर्वी फक्त २ गाड्यांची ये-जा सुरु होती. आज रोजी १९ गाड्यांची ये-जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप अॅन्ड डाबुन १८ गाड्यांच्या तुलनेत ३८ रेल्वेगाड्या आज सातारा कराड मधुन धावतायत, एकदा डोळ्यात अंजन घालुन बघा म्हणजे दिसेल आणि समजेल, सातारा शहरात रस्त्यांची कामे साखा मार्फत वेळोवेळी झाली आहेत.

Shivendraraje Bhosale| Udayanraje bhosale
खासदार बारणेंचा शिवसेनेला धक्का; मावळातील पदाधिकारी शिंदे गटात

आता पावसाळयात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचे पॅचिंगचे काम प्रशासनाने हाती घ्यावे अशी सूचना एक लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे. आमच्या घरासमोरील रस्ता झाला किया नाही झाला तरी सामन्य सातारकरांच्या गल्लीबोळातील रस्ते झाले पाहीजेत अशी आमची प्रशासनाला विनंती सूचना आहे. विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारण विकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. आम्ही या मातीचे ऋण मानणारे आणि समाजामुळे आमचे स्थान आहे ही ठाम धारणा असणारे सर्वसामान्य जनतेच आहोत.

नगरपालिकेविषयी बिनबुडाचे आरोप करणे निरर्थक आहे. सातारकरांनी आमच्याकडे सत्ता सोपवली म्हणून आरोप होणार हे अपेक्षित आहे. निवडणुकीमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराबाबत जनता जनार्दन जो कौल देईल तो आम्हाला मान्य असेल तथापि त्यांच्या आरोपांना आम्ही किया सातारकर कधीच भीक घालणार नाहीत असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फटकारले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com