सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत पुकारलेल्या बंडामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातून प्रतिसाद वाढू लागला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या सहा जागांपैकी तीन जागांवरील उमेदवार सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. माढ्याचे शिवसेना उमेदवार संजय कोकाटे व मोहोळचे शिवसेना उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी आपण शिंदे गटासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. (MLA Shahaji Patil, CM Eknath Shinde, Solapur Latest News)
शिवसेनेने (Shivsena) जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागा 2019 मध्ये लढविल्या होत्या. त्यापैकी सांगोल्यातून शहाजी पाटील (Shahaji Patil) हे एकमेव आमदार विजयी झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीतून आमदार पाटील यांनी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली आहे. जिल्ह्यातील दोन उमेदवारांनीही आता मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिला आहे. मंगळवारी मंत्रालयात सोमेश क्षीरसागर व संजय कोकाटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील सोबत होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील बार्शीचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल, शहर मध्यचे उमेदवार माजी आमदार दिलीप माने व करमाळ्याच्या उमेदवार रश्मी बागल हे सध्या कोणासोबत आहेत? याबाबत मात्र चित्र स्पष्ट होताना दिसत नाही. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये आता मोहोळमधून क्षीरसागर व माढ्यातून कोकाटे यांची भर पडली आहे.
आमदार सावंत तरीही डिस्कनेक्टच...
शिवसेनेच्या संपर्कप्रमुखपदी काम करतानाही आमदार तानाजी सावंत यांचा सोलापूर जिल्ह्याशी संपर्क तुटलेलाच होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत आमदार सावंत अग्रभागी होते. राज्यात त्यांच्या विचारांचा मुख्यमंत्री झाला तरीही आमदार सावंत यांचा सोलापूरशी संपर्क तुटलेलाच आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेची बांधणी करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. ही पोकळी कोणता नेता भरून काढणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.