NCP News: अजितदादांच्या नेत्याचा नादच खुळा; नृत्यांगनेवर पैसे उधळणं आलं अंगलट...

Bhandara News: सभापती रितेश वासनिक (वय 35) यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NCP News
NCP News Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara News: भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडईमध्ये तरुणीला पूर्ण विवस्त्र करीत नृत्य केल्याचा प्रकार ताजा असतानाच भंडारा जिल्ह्यात असाच प्रकार घडला आहे. लावणीच्या कार्यक्रमात नृत्यांगनेवर पैसे उधळणं अजित पवार गटातील नेत्याच्या अंगलट आले आहे.

या प्रकरणी अजित पवार गटातील नेते सभापती रितेश वासनिक (वय 35) यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात बीड सीतेपार येथे लावणीच्या कार्यक्रमात नृत्यांगनेवर पैसे उधळणे मोहाडी पंचायत समितीचे सभापती वासनिक आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शौकिनांना चांगलेच महागात पडले आहे. फिरोज गजभिये (वय 25), विक्की गायधने (वय 25), आशिष देशकर (वय 25), दुर्योधन बावनकुळे (वय 30) विक्की जिभकाटे (वय 25) आणि आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात असभ्य वर्तन...

जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता गावातील मंडईत तमाशा व लावणीचे आयोजन करण्यात आले. लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनेवर या सातही जणांनी पैशाची उधळण केली. सार्वजनिक कार्यक्रमात असभ्य वर्तन व सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी वरठी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नाकाडोंगरी येथे तीन दिवसांपूर्वी न्यूड डान्स झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP News
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी शेतीही विकली; ना आरोग्य ना कुटुंबाची चिंता, फक्त आरक्षण अन् आरक्षणच!

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडईमध्ये तरुणीला पूर्ण विवस्त्र करीत नृत्य करविण्यात आल्याचं प्रकरण गोबरवाही पोलिसांना चांगलच भोवलंय. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित केले होते. या प्रकरणाचा फटका पोलिस निरीक्षकांनाही (PI) बसलाय. नाकाडोंगरीतील या प्रकरणाचा ‘सरकारनामा’ने सर्वांत प्रथम पर्दाफाश केला होता.

नाकाडोंगरीतील या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ‘सरकारनामा’चे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांच्याशी फोनवर विस्तृत चर्चा केली. महिलांना विवस्त्र करून नाचविण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं थातूरमातूर कारवाई करून काही होणार नाही. ठोस पावले उचला, असे आदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिलेत.

NCP News
Sarkarnama Impact : नाकाडोंगरीतील डान्सप्रकरणी ‘पीआय’ ‘कंट्रोल रूम अटॅच’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com