राजन पाटलांचे चॅलेंज उमेश पाटलांनी स्वीकारले : ‘तुम्ही स्वतः माझ्या विरोधात निवडणूक लढवा...’

वाघ हा स्वतः शिकार करतो, तो इतरांकडून करून घेत नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, हे माजी आमदारांनी आता सोडून द्यावं.
Rajan Patil -Umesh Patil
Rajan Patil -Umesh PatilSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी स्वतः मोहोळ तालुक्यातील कुठल्याही मतदारसंघातून माझ्या विरोधात उद्याची जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी उभं राहावं. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे करू नये. निवडणुकीत त्यांनी स्वतः उतरावं, माझी लढण्याची तयारी आहे, असे आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पक्षाचेच माजी आमदार पाटील यांचे आव्हान स्वीकारले. (Umesh Patil accepted Rajan Patil's challenge to contest the election)

माजी आमदार राजन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरात पत्रकार परिषद घेत उमेश पाटील यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले होते. त्याला उमेश पाटील यांनी आज (ता. २० नोव्हेंबर) मोहोळमध्ये पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.

Rajan Patil -Umesh Patil
उमेश पाटलांनी आता मोहोळमधून निवडणुकीला उभचं राहावं : राजन पाटलांनी दिले चॅलेंज

चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मला ओळखतात. मला कोणी ओळखत नाही म्हटलं तर मी सार्वजनिक जिवनातून निवृत्ती घेईन, असे उत्तर पाटील यांनी माजी आमदारांच्या ‘मोहोळ तालुक्यात उमेश पाटील यांना कोणी ओळखत नव्हतं’ या विधानावर दिले. पाटील म्हणाले की, भीमा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाची किती ताकद आहे, हे दिसून आले आहे. ही आगामी निवडणुकांची लिट्‌मस टेस्टच होती. तालुक्यातील तीन-चार गावे वगळता त्यांच्या पॅनेलला शंभरपेक्षा जास्त मतं मिळालेली नाहीत.

Rajan Patil -Umesh Patil
मौनात गेलेले कोल्हे अवतरले अन्‌ भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले ‘मी राष्ट्रवादीत...’

राजन पाटील यांच्या निवडणूक लढविण्याच्या आव्हानाबाबत उमेश पाटील म्हणाले की, मी दोन वर्षांपूर्वीच राजन पाटील यांना आव्हान दिलं हाेतं, तुम्ही तुमचं अनगर सोडा, मी नरखेड सोडतो. तालुक्यातील इतर कोणत्याही भागात येऊन तुम्ही स्वतः निवडणूक लढवा. मी त्या ठिकाणी उभा राहतो. मी जर निवडणूक हरलो, तर मी मोहोळचं नाही तर सोलापूर जिल्ह्याचं राजकारण सोडून देतो. मी दिलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली आहेत. त्यामुळे ते काय मला चॅलेंज देणार, असा सवालही त्यांनी केला.

Rajan Patil -Umesh Patil
राज्यपालांच्या विधानावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राजघराण्यातील सदस्य म्हणून मी...’

वाघ हा स्वतः शिकार करतो, तो इतरांकडून करून घेत नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, हे माजी आमदारांनी आता सोडून द्यावं. भीमा कारखान्याच्या निवडणुकीत राजन पाटील यांनी त्यांच्या मुलांना उतरवलं नाही. कार्यकर्त्यांची घरं जाळायची आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांची माती करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

नेत्याच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र अनगरमध्ये आहे का?

उमेश पाटील म्हणाले की, माझ्या विरोधात नरखेडमधील लोक बोलतात, त्याचं मी समर्थनचं करतो. कारण, नेत्याच्या विरोधात बोलण्याचं स्वतंत्र असलं पाहिजं. पण, ते स्वातंत्र्य अनगरमध्ये आहे का, हेही तपासा. ही लढाई राष्ट्रवादी विरोध राष्ट्रवादी अशी नसून जुलमी, एकाधिकारशीही, असभ्य, असंस्कृत अशा नेतृत्वाविरोधात ही लढाई आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तो पक्षाच्या पातळीवरचा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com