Karad Sugar Factory News : उंडाळकरांचा रयत कारखाना कर्जमुक्त; १४ मेगावॉट वीजनिर्मिती करणार : ॲड. उदयसिंह पाटील

Udaysinh Patil Undalkar शेवाळेवाडी (म्हासोली) (ता. कऱ्हाड) येथील रयत कारखान्याच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून उदयसिंह पाटील बोलत होते.
Rayat Sugar factory, Udaysinh Undalkar
Rayat Sugar factory, Udaysinh Undalkarsarkarnama
Published on
Updated on

-जगन्नाथ माळी

Karad Rayat Sugar factory News : रयत सहकारी साखर कारखान्यास अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने चालवताना कारखाना पूर्ण कर्जमुक्त झाला आहे. यावर्षीपासून रयत कारखाना पाच हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊसगाळप करणार असून, १४ मेगावॉट वीजनिर्मितीही करणार असल्याची माहिती कारखान्‍याचे अध्‍यक्ष ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी वार्षिक सभेत दिली.

शेवाळेवाडी (म्हासोली, ता. कऱ्हाड) येथील रयत कारखान्याची Rayat Sugar Factory २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ॲड. उदयसिंह पाटील Udaysinh Patil बोलत होते. या वेळी उपाध्‍यक्ष अप्पासाहेब गरुड, ‘अथणी-रयत’चे युनिट हेड रवींद्र देशमुख, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, खरेदी-विक्री संघाचे अध्‍यक्ष अनिल मोहिते, कोयना बँकेचे अध्‍यक्ष रोहित पाटील, शामराव पतसंस्थेचे अध्‍यक्ष बळवंत पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. पाटील म्हणाले, ‘‘या गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप करून गाळपास आलेल्या उसास तालुक्यात उच्चांकी असा प्रतिटन २९२५ एक रकमी भाव दिला आहे.’’ यावर्षी ७ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यास सभासद, शेतकरी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

Rayat Sugar factory, Udaysinh Undalkar
साताऱ्यातला उदयनराजेंचा विसर्जन मिरवणुकीतला डान्स बघाच | Udayanraje Bhosale in Satara

प्रारंभी संस्थापक (कै). विलासराव पाटील उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्‍यात आली. सभेत विषयपत्रिकेचे वाचन शैलेश देशमुख यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेस जयवंतराव मोहिते, बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोंद्रे, जगन्नाथ माळी, तुकाराम काकडे, हिम्मत पाटील, पंजाबराव देसाई, विजया माने, रमेश देशमुख, प्रकाश पाटील, किसनराव जाधव, दीपक पिसाळ, हणमंतराव चव्हाण कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com