जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा : म्हणाले...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांच्या वाढदिवसाला राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Anna Hazare, Jitendra Awhad
Anna Hazare, Jitendra Awhadsarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - दिल्लीतील आंदोलनामुळे जगभर प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांच्या वाढदिवसाला राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छाच राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. ( Unique birthday wishes from Jitendra Awhad to Anna Hazare: Said ... )

अण्णा हजारे हे केवळ भाजप विरोधातील सरकार विरोधातच आंदोलने करतात असा आरोप काही लोकांकडून होत असतो. अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी लोकायुक्त कायद्याबाबत राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णा हजारे व पवार कुटुंब यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. अशातच शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केंद्र सरकारकडे अंगुली निर्देश केला आहे.

Anna Hazare, Jitendra Awhad
अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत...

दिल्लीत भ्रष्टाचार, व काँग्रेसच्या केंद्र सरकार विरोधात अण्णा हजारे यांनी दहा वर्षांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ते लोकायुक्ताच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांत केंद्र सरकारच्या लष्कर विषयक धोरणांबाबत अण्णा हजारे यांनी आपले मत व्यक्त करावे अशी अपेक्षा मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

Anna Hazare, Jitendra Awhad
अजित पवार, अण्णा हजारे उद्या दिसणार एकाच व्यासपीठावर

त्यांनी या शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, "आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल ह्याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा!," असे त्यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com