महाडिकांकडून भरमू पाटलांना निरोप गेल्यास राष्ट्रवादीचे आमदार पाटील होणार बिनविरोध

कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर आमदार राजेश पाटील यांची बिनविरोध निवड शक्य
MLA Rajesh Patil
MLA Rajesh PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Kdcc bank) निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठोपाठ चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) हेही चंदगड तालुका विकास संस्था गटातून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. या गटात पाटील यांच्यासह चार जणांनी अर्ज दाखल होते. त्यापैकी एकाचा अर्ज अवैध ठरला, तर एकाने माघार घेतली. त्यामुळे दोनच उमेदवार रिंगणात आहेत. (Unopposed election of MLA Rajesh Patil is possible on Kolhapur District Bank)

आमदार पाटील यांच्यासह मोहन परब, परशराम पाटील व संजय रामचंद्र पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. यातील संजय पाटील दौलत साखर कारखान्याचे संचालक होते. दौलत साखर कारखाना बँकेचा थकबाकीदार असल्याने छाननीत या गटातील संजय पाटील यांच्यासह कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांचा इतर संस्था गटातील अर्ज अवैध ठरवला आहे. त्यातच आज (ता. ९ डिसेंबर) परशराम पाटील यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या गटात आमदार पाटील व परब ह्या दोघांचे दोनच अर्ज शिल्लक आहेत.

MLA Rajesh Patil
खोपोलीत भारतीय जनता पक्षाला धक्का!

चंदगड तालुक्यात माजी मंत्री भरमू पाटील आणि आमदार पाटील असे दोन प्रबळ गट आहेत. विकास संस्था गटातून अर्ज शिल्लक राहिलेले मोहन परब हे माजी मंत्री भरमू पाटील यांचे समर्थक आहेत. चंदगड तालुक्यातील राजकारण करताना पंचायत समितीच्या निवडणुकीपर्यंत आमदार व माजी मंत्री गटात तडजोड झाल्याची चर्चा आहे.

MLA Rajesh Patil
जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भरसभेत केली कानउघडणी!

माजी मंत्री भरमू पाटील जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नेतृत्व मानतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाडिक हेही बिनविरोधसाठी प्रयत्नशील आहेत. त्यातून त्यांच्याकडून भरमू पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चंदगड विकास संस्था गटातून आमदार पाटील बिनिविरोध होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नेत्यांची एकत्रित बैठक ता. १७ डिसेंबर रोजी होत आहे, त्या बैठकीतच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com