Madha Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच बारामतीत सुनेत्रा पवारांचा Sunetra Pawar पराभव करणार, असा इशारा उत्तम जानकरांनी दिला आहे. या भूमिकेमुळे अजित पवार गटाकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप जानकरांनी केला आहे. तसेच भाजपकडूनही जातीच्या दाखल्याबाबत धमकावण्यात येत असल्याचे ते वारंवार सांगतात. यावर जानकरांनी आपल्या लोकांना आवरावे, असा इशारा देत अजितदादांवर सडकून टीका केली आहे.
उत्तम जानकर म्हणाले, अजितदादा Ajit Pawar कोब्रा आहे, एखदा कुणाला डसल्यावर कुणाला सोडत नाही. मात्र, मीही मुंगसासारखा चिवट आहे. अजितदादांना एवढंच सांगणं आहे की, तुमच्या या लोकांना थांबवा, कारण 4 जूनला विजय मुंगसाचा होणार की कोब्य्राचा होणार हे दिसणार आहे. समजा कोब्रा डसलाच तर शरद पवारांसारखा आधारवड आमच्या पाठीमागे आहे, असा इशाराही जानकरांनी अजित पवारांना दिला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची ऑफर धुडकावत उत्तम जानकर थेट शरद पवार गटाचे माढ्यातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी मैदानात उतरले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराजय केल्यानंतरच अजित पवार गट सोडून राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जानकरांनी सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी जानकरांनी Uttam Jankar सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी जास्त हुंडा मागितल्याचा आरोप केला होता. आमचे लग्न जुळले होते, मात्र त्यांनी इतका मोठा हुंडा मागितला की आम्हाला भोवळच आली, असे सांगून पाटलांनी सूचक विधान केले होते. यावर जानकर म्हणाले, पाटलांना वाटत होते की, मी खोक्यात तडजोड करावी. मात्र माझा आयुष्यातील दहा वर्षे देण्याची मी मागणी केली. पाटलांची सुपारी मुंबईत फुटली, गुवाहटीला हळद लागली, आता त्यांचा कार्यक्रम 50 हजार मतांनी करणार आहे, असा पलटवारही जानकरांनी केला होता.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.