Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाडांचा 'डॅमेज कंट्रोल'; 'हात' सोडलेल्या नसीमभाईंना बहिणीची साद...

Mumbai Lok Sabha Election 2024 : नसीमभाई आणि त्यांच्या कटुंबीयांशी माझं घनिष्ट नातं आहे. माझे वडील खासदार होते तेव्हा ते आमच्यासोबत नेहमी राहिले आहेत. आज मी त्यांची छोटी बहीण म्हणून भेटायला आले.
Varsha Gaikwad News
Varsha Gaikwad NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची अडचण कमी होताना दिसत नाही. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. एकाही अल्पसंख्याक कार्यकर्त्याला 'न्याय' दिला नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षाचा ऐनवेळी 'हात' सोडला. यामुळे आता नुकतीच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष या त्यांची भेट घेत डॅमेज कंट्रोल करण्याच्या दृष्टीने चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेतली. या भेटीतच नसीम खान यांची मुंबईतील राजकीय मूल्य किती आहेत, याची प्रचिती येते. खान यांच्या भेटीनंतर गायकवाड म्हणाल्या, "या ठिकाणाहून ज्यावेळेला काही कार्यक्रम असतील तर नसीमभाईंनी मला आशीर्वाद द्यावेत आणि त्यांनी माझ्यासोबत उपस्थित राहावे. नसीमभाई आणि त्यांच्या कटुंबीयांशी माझं घनिष्ट नातं आहे. माझे वडील खासदार होते तेव्हा ते आमच्यासोबत नेहमी राहिले आहेत. आज मी त्यांची छोटी बहीण म्हणून भेटायला आले."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Varsha Gaikwad News
Naseem Khan : काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देणारे नसीम खान

बहिणीसोबत नसीमभाई राहणार -

"एक बहीण म्हणून त्यांना मी भेटायला आले होते आणि भाऊ म्हणून ते माझ्यासोबत उभे राहतील. ज्या ज्या वेळेला युद्धामध्ये बहिणीला भावाची गरज असते, तेव्हा भाऊ तिच्यासाठी उभा राहतो. नसीमभाई माझ्यासाठी उभे राहतील याची मला पूर्ण खात्री आहे," असे गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या.

नसीमभाईंनी का सोडला 'हात'?

राजीनामा दिल्यानंतर नसीम खान (Naseem Khan) म्हणाले, 'पक्षाने मला तयारी करायला सांगितली होती, मात्र अचानक काय झाले की, मला उमेदवारी दिली नाही. उत्तर मध्य मुंबईतून मला तयारी करायला सांगितली होती. मात्र, अचानक काय झालं मला माहीत नाही. माझी नाराजी आहे."

Varsha Gaikwad News
Shivsena Vs BJP: "मंगळसूत्रास हात घातला मोदींनी अन् कारवाईचा बडगा उगारला नड्डांवर," ठाकरे गटाचा हल्लाबोल

"महाराष्ट्रात एकही काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार नाही. मतदान मुस्लिम समाजाचे पाहिजे, मग उमेदवार का नाही? असा प्रश्न समाज मला विचारेल त्यांना मी काय सांगणार? उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की, नाही याचा निर्णय मी घेईल. माझी जी काही नाराजी आहे, ती मी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहे," असेही लोकसभा उमेदवारीबाबत बोलताना नसीम खान म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com