Uttam Jankar : उत्तम जानकरांनी भाजपला धू धू धुतले; नेमके काय म्हणाले?

Madha Lok Sabha Constituency : दिल्लीत आणि राज्यात सरकार होते. त्यांच्याकडे समुद्र होता, त्यामुळे माळशिरसच्या विकासासाठी तांब्याभर पाणी मागितले. पाणी तर दिलेच नाही, उलट अजिदादांच्या धरणातील पाणी प्या, असे सांगण्यात आले.
Uttam Jankar
Uttam JankarSarkarnama

Karmala Political News : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjeetsingh Naik Nimbalkar यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकरांनी रान पेटवले आहे. या नेत्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. करमाळ्यात शुक्रवारी (ता. 26) झालेल्या सभेत उत्तमराव जानकरांनी गेल्या दहा वर्षांचा हिशेब मागताना भाजपला धू धू धुतले.

उत्तम जानकर Uttam Jankar म्हणाले, 1990 पासून म्हणजे गेली 30-35 वर्षे भाजपमध्ये काम केले. 2014 ला सरकार आले आणि आमच्या अपेक्षा उंचावल्या. त्यावेळी माझा पाच हजार मतांनी पराभव झाला होता. दिल्लीत आणि राज्यात सरकार होते. त्यांच्याकडे समुद्र होता, त्यामुळे माळशिरसच्या विकासासाठी तांब्याभर पाणी मागितले. पाणी तर दिलेच नाही, उलट अजिदादांच्या धरणातील पाणी प्या, असे सांगण्यात आले.

गेल्या दहा वर्षांत भाजप BJP सरकारने करंटेपणा, नालायकपणा केला आहे. गेल्या लोकसभेला माळशिरसमधून मोहिते पाटील आणि मी एकत्रितपणे काम करून एक लाख 16 हजार मताधिक्य दिले होते. त्यातून 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, बीडवरून माणूस आणला आणि मला डावलले. येथील मोहिते पाटील आणि माझे आमचे नेतृत्व संपवण्याचा डाव भाजपने टाकला. आता लोकसभेची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी तर दिलीच नाही, पण पक्षसुद्धा सोडून जायचा नाही, असा दम देण्यात आला, असा आरोपही जानकरांनी केला आहे.

Uttam Jankar
Loksabha Election : लष्करी सैनिकांचे ‘ईटीपीएस’ प्रणालीद्वारे मतदान, नगर जिल्ह्यातील 9 हजार 986 सैनिक कार्यरत

जानकर म्हणाले, भाजपने इतका दम दिला की त्यापूर्वी असा दम कुणीच दिला नाही. यापूर्वी आम्ही साहेबांना सोडून गेलो होतो, मात्र, भाजपसारखी दमबाजी झाली नव्हती. तुमचा जातीचा दाखला ठेवणार नाही. निवडणूक झाल्या झाल्या तुम्हाला तुरुंगात टाकू, अशी भाषा वापरण्यात येत होती, असेही जानकरांनी स्पष्ट केले.

भाजपला धडा शिकवणार

जानकरांनी शरद पवार Sharad Pawar गटात न जाता भाजपसोबत राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खास विमान पाठवले होते. त्यावरही जानकरांनी टीका केली. ते म्हणाले, नागपूरच्या विमानात अनेक मंडळी होती ते आज माझ्यावर टीका करत आहे. जानकरांनी हुंडा इतका मागितला की आम्ही भोवळ येऊन पडलो, असे ते सांगत आहे. ते आज सर्व काही द्यायला तयार आहे. आमदारी, केंद्रात मंत्रीही देतील. त्यांना फक्त माझे दहा वर्षांचे आयुष्य भरून द्या, असे सांगितले. तसेच भाजपची सुरू असलेले राजकारणाची पद्धत मोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जानकरांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहाजीबापूंचा कार्यक्रम करणार

भाजपकडून ऑफर येत असताना तेथे आमदार शहाजी पाटील Shahaji Patil होते. शहाजीबापूंना वाटत होते की खोक्यामध्ये काहीतरी मागावे. मात्र त्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांचे लग्न ठरले मुंबईला. हळद लागली गुवाहटीला. आता सांगोलकर त्यांचा पराभवाची वाट पाहतात. सांगोलकर त्यांचा 50 हजार मतांनी पराभव करणार आहेत, असा शहाजी पाटलांनाही जानकरांनी इशारा दिला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Uttam Jankar
Lok Sabha Election 2024 : हृदयविकाराचा झटका अन्..! मतदानाच्या रांगेतच डॉक्टरने वाचवले महिलेचे प्राण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com