Uttam Jankar News : "सब कुछ जल गया है, अब बचा ही क्या है; शरद पवार आप है तो जलाही क्या है,"

Uttam Jankar On Bjp : "भाजपत गेलं तर राम आणि पक्ष सोडला की लगेच दाऊद इब्राहिम होतो," अशी टीकाही उत्तम जानकर यांनी केली आहे.
uttam jankar sharad pawar
uttam jankar sharad pawarsarkarnama

Solapur News, 4 May : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांना थोडी कळ काढायला सांगितली होती. तुम्हाला गंगेच पाणी पाजतो. निवडणूक जवळ आली आहे. पण, त्यांना ( अजित पवार ) अशुद्ध पाणी पिऊन तहान भागवायची होती. ज्यांना अशुद्ध पाणी प्यायचं होतं, त्यांच्याबद्दल शरद पवार यांना काय करायचं, असं म्हणत उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ( Vijaysinh Mohite Patil ), राष्ट्रवादीचे नेते भूषणसिंहराजे होळकर उपस्थित होते. यावेळी उत्तम जानकर यांनी शेरो-शायरी केली. तसेच, अजित पवार यांना लक्ष्य केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तम जानकर ( uttam Jankar ) म्हणाले, "शरद पवार यांना मुलगा नाही. त्यामुळे अजितदादांना मुलगा मानलं. राज्यातील सगळं काही अजितदादांना दिलं. तरी सुद्धा अजितदादांनी शरद पवार यांचा घात केला. या वयात शरद पवार उभारी घेतली आणि तुतारी फुंकतील, हे राज्यात जनतेला अशक्य वाटत होतं. मात्र, आमच्यासारखी तुटकी-फुटकी माणसं जिद्द बाळगून होती. त्यामुळे हे शक्य झालं."

"महाराष्ट्रावर अन्याय सुरू आहे. शेतकरी हवालदिल आहे. गोरगरीब जनतेवर अन्याय केला जातोय. अशा परिस्थितीत शरद पवार देत असलेल्या लढतीबद्दल एक शेर आठवत आहे. सब कुछ जल गया है, अब बचा ही क्या है... शरद पवार आप है तो जलाही क्या है...", अशी शेरो-शायरी उत्तम जानकर यांनी केली.

uttam jankar sharad pawar
Uttam Jankar News : 77 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या कावळ्याला चुना लावून लावून बगळा केला; जानकर अजितदादांवर बरसले

"भाजपत गेलं तर राम आणि पक्ष सोडला की लगेच दाऊद इब्राहिम होतो. सत्तेत लाखो घोटाळेबाज आहेत. त्या घोटाळेबाजांचा पैसा आणून गोरगरिबांना वाटायचा आहे. आपल्या राज्यातील 77 हजार कोटींचा घोटाळा करणारा एक माणूस सापडला आहे. आदल्या दिवशी कावळा होता. सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना या कावळ्याला लावत बगळा केला. तो बगळा आता पांढरा शुभ्र झाला असून मतदाररूपी मासे हुडकत आहे," अशी टीका उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

uttam jankar sharad pawar
Uttam Jankar News : "अजितदादांचा पराभव करूनच पक्ष सोडणार", उत्तम जानकर कडाडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com