Uttam Jankar : धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल झाला तर...; उत्तम जानकरांचा वेळापुरातून सरकारला इशारा

Madha Lok Sabha Constituency : भाजपकडून राज्यातील प्रत्येकाला भीती दाखवली जाते आहे. मलाही म्हणाले तुमचा दाखलाच ठेवणार नाही. न्यायव्यवस्था आमच्या बाजूला आहे. मग तुम्ही कसे आमदार होणार, अशी धमकी दिल्याचे आरोप उत्तम जानकरांनी केला.
Uttam Jankar
Uttam JankarSarkarnama

Madha Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची Devendra Fadnavis ऑफर धुडकावत अजित पवार गटाच नेते उत्तम जानकरांनी वेळापूर येथे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी जाहीर सभा घेतली. वेगळी भूमिका घेतल्याने भाजपने धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर उमेदवार असल्यासारखा संपूर्ण मतदारसंघ पालथा घालून धैर्यशील यांना निवडून आणणार आणि जेल फोडून त्यांची विजयी मिरवणूक काढणार, असा थेट इशाराच उत्तम जानकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

जानकर म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटलांवर Dhairysheel Mohite Patil गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा आहे 2020 मधला, मात्र आज निवडणुकीला उभा राहत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. मला या सरकारला सांगणे आहे की तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. धैर्यशील यांना जेलमध्ये बसू द्या. मी उमेदवार आहे असे समजून संपूर्ण सहाही विधानसभा मतदारसंघात फिरून त्यांना तीन लाखांच्या फरकाने निवडून आणणार, असा विश्वास उत्तम जानकरांनी व्यक्त केला. तसेच ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल येईल त्या दिवशी बेल मिळाला नाहीतर जेल फोडून धैर्यशील यांची जंगी मिरवणूक काढणार, असा इशाराच जानकरांनी दिला आहे.

भाजपकडून BJP राज्यातील प्रत्येकाला भीती दाखवली जाते आहे. मलाही म्हणाले तुमचा दाखलाच ठेवणार नाही. न्यायव्यवस्था आमच्या बाजूला आहे. मग तुम्ही कसे आमदार होणार, अशी धमकी दिल्याचे आरोप उत्तम जानकरांनी Uttam Jankar केला. मात्र राज्याच्या राजकारणाची अशी संस्कृती नव्हती. राजकारणात शत्रुत्व असते. मोहिते पाटलांनीही माझ्यावर 27 गुन्हे दाखल केले होते. मात्र मी ही फार काही गुणी बाळ नव्हतो. मात्र उत्तम जानकर आमदार होण्यासाठी लढत नाही तर ही लढाई राज्याच्या अस्तित्वाची आहे. पदे येतील जातील, मात्र जर न्यायव्यवस्था अशी वागत असेल तर हा जानकर बॉम्ब बनून काम केल्याशिवाय राहणार नाही, असेही जानकरांनी स्पष्ट केले.

Uttam Jankar
Sharad Pawar News : नव्या पालवीत जुन्या खोडाची ओळख; कन्हेरीच्या सभेत पुन्हा पवारांच्या स्मरणशक्तीची चुणूक

भाजपने गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्याला नागवले आहे. एकही आमदार दुसऱ्या बाजूने नाही, अशी स्थिती नाही. बाळदादाने विजयाचा आकडा एक 40 हजार आहे. त्यात आपल्याला थोडी वाढ करण्याची आहे. त्यासाठी जानकरांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचे गणित उलगडून सांगितले. तसेच विधानसभेला माझ्या मदतीला नाही आले तरी चालेल, मात्र ही वेळ आणीबाणीची आहे. ही राज्याच्या परिवर्तनाची वेळ आहे. मोहिते पाटील हे उत्तम जानकरांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच बाहेर पडले आहे. त्यामुळे आपल्याला शब्द पाळावा लागणार आहे, असे आवाहनही जानकरांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Uttam Jankar
Parbhani Lok Sabha News : मराठा-ओबीसी संघर्षावर महादेव जानकर म्हणतात, "मराठा तरुणांना माझं एकच सांगणं..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com