वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी तर भाजपचे ( BJP ) माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजप उमेदवारांसाठी अकोले शहरात प्रचार सभा घेतली.
वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड, डॉ. किरण लहामटेसरकारनामा
Published on
Updated on

अकोले ( अहमदनगर ) : अकोले नगरपंचायतीची उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत कालच संपली. त्यामुळे शहरातील 13 ही प्रभागांतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज ( मंगळवारी ) एकादशीचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ वाढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी तर भाजपचे ( BJP ) माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजप उमेदवारांसाठी अकोले शहरात प्रचार सभा घेतली. Vaibhav Pichad said, we have only developed for forty years ...

अकोले नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार प्रारंभ माजी मंत्री मधुकर पिचड, हेमलता पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत गुजरी चौकात झाला. तत्पूर्वी अकोले शहरातून मिरवणूक काढून उमेदवारांनी अगस्ती ऋषी आश्रमात दर्शन घेऊन सभास्थानी येताच सभेला सुरुवात झाली. आर पी. आय.चे विजय वाकचौरे, शिवाजी धुमाळ, कैलास वाकचौरे, सभापती उर्मिला राऊत, चंद्रकांत सरोदे, कल्पना सुरपुरिया, जे. डी. आंबरे, गिरजाजी जाधव, रमेश धुमाळ,तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, वसंत मनकर, उपसभापती दत्ता देशमुख, के. डी. धुमाळ, जिल्हा सरचिटणीस यशवंत आभाळे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सुभाष कोळपकर होते. रणजित शिंदे, मंगल मालुंजकर यांच्यासह सात अपक्षांनी पाठिंबा दिला.

वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड म्हणाले, निवडणुकीत दिलेले शब्द पाळा...

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रचार सभेत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सत्ता द्या, विकास पहा, असे आवाहन केले होते. यावर वैभव पिचड म्हणाले, आम्ही मागील चाळीस वर्षांत काय केले तर मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मात्र त्यात राजकारण आणलं नाही. तुम्ही गेल्या दोन वर्षांत काय कामे केली ते सांगा. पदाधिकारी कार्यकर्ते आजपासून तयारीला लागा. केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. कुठल्याही आमिषाला भूलथापांना बळी न पडता भाजप मित्रपक्षांच्या सर्व उमेदवाराना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन वैभव पिचड यांनी केले.

वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

धुमाळ म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधीच्या दबावाला आणि दडपशाहीला बळी पडू नका. जालिंदर वाकचौरे यांनी येथे भाजप प्रदेश आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. घाबरू नका हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोप घेऊन मी येथे आलो आहे. येथे आपला विजय निश्चित आहे, असे ठामपणे सांगितले.

हितेश कुंभार यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. यशवंत अभाले यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com