Video Hasan Mushrif : 'मुश्रीफांनी पालकमंत्री पदासाठी केली नात्यांची डील'; समरजीत घाटगेंचा हल्लाबोल

Samarjit Singh Ghatage Allegation on Hasan Mushrif : घाटगे म्हणाले आहेत, एक काळ होता की हे सर्व त्यांचं कुटुंब होतं, पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीवाप्रमाणे वागवायचे. आता त्यांना फस्ट्रेशन आलेला आहे आणि ते माझ्यावर काढत आहेत. अशा शब्दात घाटगे यांनी मुश्रीफ यांचा समाचार घेतला आहे.
Hasan Mushrif-Samarjit Ghatge
Hasan Mushrif-Samarjit GhatgeSarkarnama
Published on
Updated on

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या बद्दल अपशब्द काढल्यानंतर घाटगे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. मुश्रीफ यांच्यावर थेट टीकेचे वर्मी घाव घालत त्यांच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं आहे. घाटगे म्हणाले आहेत, एक काळ होता की हे सर्व त्यांचं कुटुंब होतं, पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीवाप्रमाणे वागवायचे.

सुप्रिया ताई त्यांना मोठ्या भावा प्रमाणेच राखी बांधायच्या. पण त्यांनी या नात्यांचा सौदा केला. या नात्यांची 'डील' केली. ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी सौदा केला. या सौद्यामुळे त्यांना सध्या रात्री झोप येत नाही. त्यांना झोप येत नसल्यामुळे माझ्याबद्दल त्यांचे असे चुकीचे शब्द येत आहेत. त्यांना फस्ट्रेशन आलेला आहे आणि ते माझ्यावर काढत आहेत. अशा शब्दात घाटगे यांनी मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा समाचार घेतला आहे.

Hasan Mushrif-Samarjit Ghatge
Amit Shah News : लोकसभेतील अपयशानंतर उदास झालेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये अमित शाहांनी 'असा' भरला हुंकार

शासनाचे पैसे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोकशाही मार्गातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे काम असतं. ते त्यांच कर्तव्य असतं, मग तुम्हाला शासनाचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं काम केल्यानंतर पावशेर ठेवायची आवश्यकता का वाटते ? लाभार्थ्यांना कोणाच्या मिंती ठेवायचं नाही. लाभार्थ्यांच्या डायरेक्ट हातामध्ये पैसे गेले पाहिजेत असं नियोजन आपलं सरकार आल्यानंतर होणार असल्याचं घाटगे यांनी सांगितले.

Hasan Mushrif-Samarjit Ghatge
Dharmraj Kadadi : काडादींनी वाढविले महाआघाडीतील इच्छुकांचे टेन्शन; ‘दक्षिण’च्या रणांगणात उतरण्याचे थेट संकेत

कागल, गडहिंग्लज, उत्तर विधानसभा भागातील सर्व एजंटचे धंदे बंद पाडायचे आहेत. कुठलीही एजंटगिरी आणि खंडणीखोरपणा या विधानसभा मतदारसंघात मी खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीने मला हृदयाने स्वीकारलेले आहे. माझ्याबद्दल सध्या ते अपशब्द वापरत आहेत पण ते अपशब्द का वापरतात? याचा विचार करणे गरजेचे आहे. कागल इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे (Samarjitsingh Ghatge) यांनी हसन मुश्रीफ यांचा समाचार घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com