Mohite Patil : भाजप मतदारांच्या डोळ्यांवर व्हिडिओ रेकॉर्डिंगचे गॉगल : मोहिते पाटलांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद मतदानावेळी काही मतदार व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे गॉगल घालून आल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. आक्षेपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गॉगल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 June : विधान परिषदेच्या मतदानासाठी काही मतदार हे व्हिडिओ रेकॉर्ड होणारे गॉगल घालून केंद्रावर आले होते. आमच्या आक्षेपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे गॉगल जप्त केले आहेत. भाजप नेत्यांचा आपल्याच मतदारांवर विश्वास नसल्याचे यातून दिसून येत आहे, असा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. या वेळी मोहिते पाटील यांनी काही गॉगल पत्रकार परिषदेतही दाखवले.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख निवडणूक लढवत आहेत. मात्र, महायुतीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांंनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर एक प्रकार घडला आहे. घटनेने मतदारांना जो अधिकार दिला आहे, त्यांचा तो मतदानाचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता, त्यामुळे आम्ही कोणतीही पोलिस तक्रार दिली नाही. त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड होणारे गॉगल घालून काही मतदार आले होते. आमच्या आक्षेपानंतर ते गॉगल काढून नष्ट करण्यात आले आहेत.

Dhairyasheel Mohite Patil
Solapur MLC Voting : सोलापुरात विधान परिषदेसाठी 99. 68 टक्के मतदान : भाजपच्या दोघांचे मतदान झाले नाही; ते दोघे कोण?

ते भाजपच्या काही नगरसेवकांनी व्हिडीओ रेकॉर्ड होणारे गॉगल मतदान केंद्रावर आणले होते. आम्ही त्याच्यावर आक्षेप घेत, हे गॉगल जप्त करायला लावले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही ते जप्त केले, असे सांगून त्यातील एक गॉगल आम्ही आणला आहे. या गॉगल मध्ये व्हिडीओ रेकॉर्ड होतो, असा दावा खासदार मोहिते पाटील यांनी केला.

Dhairyasheel Mohite Patil
Siddharam Mhetre : एकनाथ शिंदेंचा आदेश अन्‌ पालकमंत्री गोरेंचा शब्द : सिद्धाराम म्हेत्रेंनी सांगितली महायुतीची स्ट्रॅटेजी!

भाजप नेत्यांना त्यांच्याच मतदारांवर विश्वास राहिला नसल्याने हा प्रकार घडला आहे. त्यांना पुरावा म्हणून हा व्हिडिओ पाहिजे होता. हा गॉगल आम्हाला भाजपच्या मतदारांनी दिला आहे. पण त्याचं नाव सांगून मला त्यांच्यावर अन्याय करायचा नाही. मतदारांवर आमचा विश्वास आहे, त्यांच्यातील खदखद आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही रेकॉर्डिडेड गॉगलची तक्रार केली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com