Siddharam Mhetre : एकनाथ शिंदेंचा आदेश अन्‌ पालकमंत्री गोरेंचा शब्द : सिद्धाराम म्हेत्रेंनी सांगितली महायुतीची स्ट्रॅटेजी!

Vidhan Parishad Election 2026 : अक्कलकोटमधील महायुतीतील मतभेद एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतर दूर झाल्याचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
Siddharam Mhetre
Siddharam Mhetre Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 June : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षावर सोलापुरातील शिवसेना नाराज होती. विशेषतः अक्कलकोट तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी महायुतीत असूनही त्यांची तोंडं विरोध दिशेला होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि पालकमंत्री गोरे यांनी शब्द दिला, त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात महायुती वन साईड आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.

म्हेत्रे हे आपले सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन एकत्रिपणे मतदानाला आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई आहे, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काय होणार, अशी चर्चा होती. मात्र, म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीचे काम केल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, विधान परिषदेचं चित्र काय असणार आहे, हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. शिवसेनेत थोडी नाराजीची भावना होती. पण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांना बोलावून बैठक घेतली. तसेच वरच्या लेव्हलही ठरलं.

भाजपचा जो कोटा असेल, तसेच शिवसेना, अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या काही तक्रार असणार नाहीत. पुढची तीन ते साडेतीन वर्षे महायुतीत सगळं व्यवस्थित चालेल. कुणाच्याही तक्रारी येऊ देणार नाही, असा शब्द पालकमंत्री गोरे यांनी दिला आहे, असेही माजी मंत्री म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

Siddharam Mhetre
Solapur MLC Voting : सोलापुरात विधान परिषदेसाठी 99. 68 टक्के मतदान : भाजपच्या दोघांचे मतदान झाले नाही; ते दोघे कोण?

सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, अक्कलकोट तालुक्यात सर्व महायुतीच्या बाजूने वनसाईड आहे. दुधनीत आमचे २३ पैकी २३ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषद त्यांचे (आमदार सचिन कल्याणशेट्टी) आहेत, आमचेही आहेत. तालुक्यात महायुतीच्या बाहेर कोणीही नाहीत. मैंदर्गी, अक्कलकोट, दुधनीत आम्ही सर्व एकत्रच आहेत.

Siddharam Mhetre
Vidhan Parishad Election : शिवेंद्रराजेंसमोरच उदयनराजे शशिकांत शिंदेंच्या कानात काय बोलले?; साताऱ्यातील भेटीची जोरदार चर्चा...

आपल्याला महायुतीचा धर्म तोडायचा नाही. युतीमध्ये धर्म तोडून काय उपयोग होणार नाही. कशाला उगी हे करता. आपण आता देशात, राज्याच्या सरकारमध्ये मिळून काम करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडबड करून मिठाचा खडा टाकण्यासारखं होणार आहे, त्यामुळे तसं करू नका, सगळेजण व्यवस्थित काम करा, असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, असे माजी मंत्री म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com