Satara News : रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची आज संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. संस्थेचे माजी कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांची संस्थेच्या संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे Rayat Shikshan Sanstha अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांनी संस्थेत यावर्षी भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी नऊ मे यादिवशी निवड केली जाते. मात्र, यावर्षी नऊ मे रोजी कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, ऑडिटर यांची निवड केली होती.
त्यावेळी श्री. पवार यांनी संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थेच्या कार्याध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची निवड केली. आजही प्रथमच संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची निवड केली. श्री. देशमुख यांनी साताऱ्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या आज (सोमवारी) झालेल्या मॅनेजिंग कौन्सिल बैठकीत डॉ. अनिल पाटील यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. पाटील हे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी संस्थेत कार्याध्यक्षपद भूषविले आहे. यापूर्वी डॉ. अनिल पाटील यांचे वडील अप्पासाहेब पाटील यांनी दीर्घकाळ संस्थेचे संघटकपद भूषविले होते.
राज्याच्या राजकारणात काल घडलेल्या घटनांमुळे आज रयत शिक्षण संस्थेच्या येथील मुख्य कार्यालयात व बाहेर राजकीय क्षेत्रातील नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, रोहित पवार, तसेच रोहित आर. पाटील, सत्यजितसिंह पाटणकर आणि राजकीय क्षेत्रातील इतर व्यक्ती, कार्यकर्ते श्री. पवार यांच्यासमवेत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.