Khatav News : वेटणे, रणसिंगवाडीचे ग्रामस्थ आक्रमक; 'जिहे-कठापूर'च्या पाण्यासाठी उपोषण करणार

Jalsampada Department जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लेखी फसवी आश्वासने देऊन दोन्ही गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत.
Jihe Kathapur Yojana
Jihe Kathapur Yojanasarkarnama
Published on
Updated on

-केशव कचरे

Khatav Political News : कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेतून वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होण्यासाठी येत्या सोमवारी (ता. 25 ) सकाळी दहा वाजल्यापासून वेटणे व रणसिंगवाडी येथील ग्रामस्थ वेटणे येथील बोगद्याच्या शाफ्टजवळ बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती संजय नलवडे, पोपट नलवडे, काशिनाथ रणसिंग यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. येत्या गांधी जयंतीपर्यंत (ता. २) कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले की, कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर jihe katapur उपसा सिंचन योजनेंतर्गत नेर धरणातून आंधळी धरणात पाणी सोडण्यासाठी तयार केलेला बोगदा 13 किलोमिटरचा असून, हा बोगदा वेटणे, रणसिंगवाडी Maan, Khatav या दोन गावांच्या भूगर्भातून जात आहे. सदर बोगद्याचे काम २००४ पासून सुरू असून, बोगद्यामुळे दोन्ही गावांच्या हद्दीतील नैसर्गिक जलस्राेत, विहिरी, बंधारे, ग्रामतळी व तलावातील पाणी बोगद्यात उतरत आहे.

सदरचे पाणी दोन्ही गावांच्या हक्काचे असून, यामुळे दोन्ही गावे पूर्णपणे बाधित झाली आहेत. या गावांना प्रचंड पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. गेली 15 वर्षे आम्ही आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत. २४ जानेवारी २००९८ रोजी दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी बोगद्याचे काम बंद पाडून जेलभरो आंदोलन केले होते. त्यावेळी ४३१ ग्रामस्थांना अटक करण्यात आली होती.

त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन देऊन आमची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एक फेब्रुवारी २००८ ला पुणे-बंगळुरू महामार्गावर वाढे फाटा येथे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन 'रास्ता रोको' आंदोलन केले होते. त्यात ५५० ग्रामस्थांना स्थानबद्ध केले होते. त्यावेळीही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

बोगद्यातील ब्लास्टिंगमुळे तडे गेलेल्या घरांना भरपाई देऊ व तुमच्या शेतीपाण्याचा प्रश्र्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. त्यावरही काहीही कार्यवाही झाली नाही. आंदोलन करूनही वारंवार आमच्यावर अन्याय होत राहिला. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लेखी फसवी आश्वासने देऊन दोन्ही गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

कायमस्वरूपी ठरलेले ०.१३ टीएससी पाणी बोगद्याच्या कामापूर्वी तातडीने न मिळाल्यास दोन्ही गावांतील ग्रामस्थ वेटणे येथील शाफ्टजवळ सोमवारपासून बेमुदत उपोषण करतील. तसेच या वेळी होणाऱ्या सर्व परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Edited By Umesh Bambare

Jihe Kathapur Yojana
Satara Political News : शिंदेसाहेब, कोरेगाव की जावळी हे एकदा ठरवाच..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com