Vinayak Raut : 'कितीही गद्दार आले तरी आघाडीचंच सरकार येणार!' विनायक राऊतांना भलताच कॉन्फिडन्स

Vinayak Raut on Mahayuti Sarkar at Kolhapur : विनायक राऊतांनी महायुती सरकारवर आणि भाजपवर चांगलाच निशाणा साधत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर तोफ डागली.
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची मशाल घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन मातोश्री येथील बैठकीमध्ये करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितित कार्यक्रम पार पडला. या बोलतांना त्यांनी महायुती सरकारवर आणि भाजपवर चांगलाच निशाणा साधत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर तोफ डागली.

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि शाह आले किंवा कितीही गद्दार आले तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. या भ्रष्टाचारी राजवटीचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ज्यांच्यावर होता ते आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. असा घनाघात ही राऊत यांनी केला.

Vinayak Raut
Sharad Pawar: CM पदावरुन शरद पवार यांनी MVAच्या नेत्यांचे टोचले कान

चोरांनी धनुष्यबाण पळवून नेला आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत गद्दारांची फौज आपल्यावरती तुटून पडली आहे. शिवसेना ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला तेच संपले. शिवसेनेचा भगवा नेहमीच फडकत राहिला आहे. असाही टोला विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला आहे.

Vinayak Raut
Madha Politics : माढ्यात बबनराव शिंदेंच्या विरोधात रात्रीत लागले बॅनर; ‘हाच का 30 वर्षांचा विकास’?

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी दहा वर्षे लढा सुरू होता. दर्जा देऊन फार मोठे उपकार केले असे कोणीही समजू नये, मराठी भाषेला न्याय देण्याचं काम मराठी जनतेने केला आहे. असा घणाघात विनायक राऊत यांनी दिला. शिवाय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा (Shivsena) दावा आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करतील, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com