
Sangli News : नुकताच जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा, मदन पाटील गट आणि काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांचा आज भाजप प्रवेश झाला. यावेळी सांगलीतील 10 ते 15 गावातील प्रमुख कार्यकर्तेही तेथे गेले उपस्थित होते. पण या प्रवेशाच्या आधी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी या प्रवेशावर तिखट टीका केली आहे. यामुळे त्यांना हा पक्ष प्रवेश खटकला असल्याचे दिसत असून त्यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. तर जयश्रीताईंचे भाजपबरोबर जाणे म्हणजे अनैसर्गिक युती असल्याचा दावा केला आहे. (Independent MP Vishal Patil criticizes Jayshree Patil’s BJP entry)
विशाल पाटील यांनी, जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी भाजपसोबत जाणे अनैसर्गिक युती आहे. त्यांनी हा निर्णय दबावाखाली घेतला असेल. त्यांचा निर्णय जनता स्वीकारणार नाही. शेवटपर्यंतहा निर्णय नेला, तर जशी पूर्वी 1999 साली अनैसर्गिक युती झाली. त्यावेळी निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे तसा फटका न बसावा अशी त्यांची इच्छा असेल तर त्यांनी आपला निर्णय बदलावा, असे आपल्याला वाटतं असल्याचेही त्यांनी (MP Vishal Patil) म्हटलं आहे.
दरम्यान जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या गटाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या तळ्यात- मळ्यात सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेसबरोबर असणाऱ्या पाच-सात मदन पाटील समर्थकांशी विशाल पाटील यांनी संपर्क करत ‘तुम्ही सोबत राहा,’ आमदार विश्वजित कदम यांना घेवून जयश्रीताईंची समजूत काढू,’ असे सांगितले आहे.
तसेच त्यांनी जयश्री पाटील यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, ‘जयश्रीताईंचा हा निर्णय ‘अंडरस्टँडिंग’ने झालेला नाही,’ असेही म्हटलं आहे. यामुळे नाराज मदनभाऊ समर्थकांवर विशाल पाटील बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेच आता दिसत आहेत. वसंतदादा घराण्याशी एकनिष्ठ कार्यकर्ते एकत्रित करण्याकडे त्याचा कल असून जयश्रीताईंच्या प्रवेशानंतर या हालचालींना सुरूवात झाली आहे.
पालिका राजकारणात विशाल पाटील आता ‘ड्रायव्हिंग सीट’वर आले आहेत. शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. त्यांच्या भाजपप्रवेशाची जोरदार चर्चा मध्यतरी रंगल्या होत्या. पण ही संधी जयश्री पाटलांनी साधली. आणि त्यांनी पृथ्वीराज पाटलांची सीटच रिझर्व्ह केली आहे. यामुळे पृथ्वीराज पाटील सध्या गोंधळलेल्या स्थितीत दिसत आहेत. त्यांचे विशाल यांच्याशी किती सूर जुळतील अशीही साशंकता असून आमदार विश्वजित कदम यांनी जयश्रीताईंवर थेट टीका टाळली आहे. यामुळे आता विशाल-विश्वजीत काँग्रेससाठी एक होणार का हे देखील पाहावं लागणार आहे.
दरम्यान भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांची केलेली स्तुती आणि दिलेल्या ऑफरवर विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या ऑफरबद्दल आभार मानले आहेत. (Vishal Patil sarcastically thanks Guardian Minister Chandrakant Patil) तसेच कदाचित त्यांना आपल्या कामाची पद्धत आवडली असेल. हीच कामाची पोहोचपावती आहे, असे आपण समजतो. पण तूर्त तरी भाजपबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय माझ्याकडून होणार नसल्याचेही विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.