Vishal Patil : चंद्रहार पाटलांचे डिपाॅझिट जप्त करून विशाल पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Vishal Patil will meet Thackeray :सांगलीच्या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा हात सोडत निवडणूक लढली
vishal patil uddhav thackeray
vishal patil uddhav thackeraysarkarnama

Vishal Patil News : सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना चितपट करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. विशाल पाटील यांनी आपला पाठींबा काँग्रेसला दिला आहे. विशाल पाटील आज (शुक्रवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

सांगलीबाबत आमची चूक झाली. विशाल पाटील Vishal Patil अपक्ष असले तरी आमच्यातीलच आहेत. ते आम्हालाच महाविकास आघाडीला पाठिंबा देतील, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते. विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गै यांना पाठींब्याचे पत्र देत ते महाविकास आघाडी सोबतच असल्याचे सांगितले.

सांगलीच्या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा हात सोडत निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील. मात्र, ठाकरे गटाच्या विरोधात ही निवडणूक जिंकल्याने ठाकरे गटात नाराजी होती. हीच नाराजी विशाल पाटील उद्धव ठाकरेंना भेटून दूर करणार असल्याच्या चर्चा आहेत.

vishal patil uddhav thackeray
Bhavana Gawali : राजश्री पाटलांच्या पराभवानंतर गवळींची खदखद बाहेर; म्हणाल्या, "...तर सहाव्यांदा खासदार झाले असते"

चंद्रहार पाटील यांचे डिपाॅझिट जप्त

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ 60 हजार 861 मतं मिळाली. त्याचे डिपाॅझिट जप्त झाले. खरी लढत भाजपचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात झाली. या लढतीत विशाल पाटील यांनी एक लाख मतांच्या फरकाने विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com