विशाल फटेच्या बायकोचे गंठण आणि कानातील रिंगाही पोलिसांकडून जप्त...

बार्शीच्या जिल्हा व सत्र न्यायालायने विशाल फटे याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
Vishal Phate
Vishal Phate sarkarnama
Published on
Updated on

बार्शी (जि. सोलापूर) : राज्यभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal phate) याला बार्शीचे (barshi) जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश आज (ता. १ फेब्रुवारी) दिला आहे. दरम्यान, विशाल फटे व त्याच्या पत्नीचे १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. त्यात चार तोळ्याचे कडे, पाच तोळ्याची चैन, तीन तोळ्याचे गंठण आणि तीन तोळ्याच्या अंगठ्या आणि कानातील रिंगांचा समावेश आहे. त्याची किंमत ५ लाख ३६ हजार ४०० रुपये आहे, तर रोख रक्कम १ लाख ६८ हजार २९० रुपये असा एकूण ७ लाख ४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Vishal phate of Barshi has been remanded in judicial custody for 14 days)

जादा रक्कमेच्या आमिषाने विशाल फटे याने १२९ गुंतवणूकदारांची २४ कोटी ९९ लाख ११ हजार ५२० रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्याला मंगळवारी बार्शी न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी बार्शी न्यायालयाने वरील आदेश दिला.

Vishal Phate
प्रभाग रचना जाहीर होताच भाजपच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीच्या जगतापांना फोन!

तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, विशाल फटे याच्याकडून झालेल्या फसवणुकीचा तपास सुरु आहे. अंबादास फटे, वैभव फटे न्यायालयीन कोठडीत आहेत. राधिका फटे व अलका फटे यांना अद्याप अटक झालेली नाही. विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि., अलका शेअर सर्व्हिसेस, जे. एम.फायनान्सियल सर्व्हिसेस अशा वित्तीय संस्था स्थापन करुन त्याने जादा रकमेचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. ही रक्कम वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवत असल्याचे त्याने संबंधितांना सांगितले होते. मात्र, त्याचा भांडाफोड झाला आहे. हजारो नागरिकांची फसवणूक करून तो फरार झाला होता. त्यानंतर तो स्वतःच पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

Vishal Phate
दूध पंढरीचा आखाडा : दिलीप माने, बळीराम साठे, आवतडेंना धक्का; २६ जणांचे अर्ज बाद!

दरम्यान, तीनही कंपनीच्या बॅंक खात्यात वर्ग केलेल्या रकमांबाबत वेगवेगळ्या बँकेचे खाते उतारे साक्षीदारांनी पडताळणी केले असता त्यांच्या रकमा ट्रान्स्फर झाल्याचे आणि त्या रकमा काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्या रकमा अजून मिळालेल्या नाहीत. शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केलेली नाही. लोकांनी जमा केलेले पैसे वरचेवर लोकांना फिरवीत होतो, असे विशाल फटे याने सांगितले आहे. पण, त्याने गुंतवणूकदारांची यादी, त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम, वरच्यावर लोकांना दिलेल्या रक्कमेबाबतची यादी सादर केलेली नाही.

Vishal Phate
डिसले गुरुजी अडकले आपल्याच चक्रव्यूहात; शिक्षण विभागाने मागितला या गोष्टींचा खुलासा!

जप्त केलेला लॅपटॉप, मोबाईल हॅण्डसेट याचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी विलंब लागणार आहे. बार्शीतील श्री भगवंत सहकारी नागरी पतसंस्थेमधील लॉकर क्रमांक ३२ व ३३ ची झडती घेतली. मात्र, त्या ठिकाणी काहीही आढळून आलेले नाही. दरम्यान, विशाल फटे याचे चुलते मच्छिंद्र फटे (रा. हाजापूर, ता. मंगळवेढा) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात विशाल फटे व त्याच्या पत्नीचे 15 तोळे सोन्याचे दागिने जमा केले आहेत. पंचासमक्ष ते जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५ लाख ३६ हजार ४०० रुपये आहे, तर रोख रक्कम १ लाख ६८ हजार २९० रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. पुण्याच्या खराडीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली. पण त्या ठिकाणी संगणकाचे हार्ड डीस्क आणि सीपीयूचे मिळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत.

Vishal Phate
भाजप आमदारास चिमटे घेत ढोबळेंकडून राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे कौतुक!

भविष्यात अपहृत रक्कम वाढण्याची शक्यता आहे. विशाल फटे याची बार्शी, मंगळवेढा तालुक्यात स्थावर, जंगम मालमत्ता आहे का, याची शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. किती गुंतवकदारांकडून किती रक्कम घेतली, त्याची विल्हेवाट कशी लावली, याबाबत कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे, त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या तपासासाठी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती, त्यानुसार न्यायालयाने फटे याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे ॲड. प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले. आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संजय बोठे तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com