भाजप आमदारास चिमटे घेत ढोबळेंकडून राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे कौतुक!

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी टनाला 2400 रुपये देवून अतिरिक्त प्रेम व्यक्त केले केले. ही ‘म्हैसाळ’च्या पाण्याची करामत आहे.
 Laxman Dhoble-Jayant Patil
Laxman Dhoble-Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : युटोपियन, भैरवनाथ, दामाजी, सीताराम, फॅबटेक हे पाच पांडव (साखर कारखाने) गुण्यागोविंदाने मंगळवेढा तालुक्यात शेतकऱ्याला सेवा देणारी मंदिरे नांदत आहेत. हे सर्व कारखाना मालक ठरवून २००० रुपये ऊसाला भाव देत असताना मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला ऊस नेत शेजारधर्म निभावला आहे. त्यांनी टनाला २४०० रुपये भाव देत मंगळवेढ्यावर अतिरिक्त प्रेम दाखवले आहे, अशा शब्दांत भाजपचे नेते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांचे कौतुक केले आहे. (Laxman Dhoble praises NCP's Jayant Patil!)

दरम्यान, ऊसदरावरून भाजप आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांच्यासह तालुक्यातील कारखानादांना चिमटे घेत ढोबळे यांनी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याबद्दल ‘कही पे निगाहे;कही पे निशाना’ अशी चर्चा सुरू झाली आहे.

 Laxman Dhoble-Jayant Patil
गृहमंत्री वळसे-पाटील आणि आढळरावांच्या कार्यकर्त्यांमध्ये अखेर मनोमिलन!

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्यात नदीकाठ व उजनी कालव्याचे लाभक्षेत्र सोडले तर इतर ठिकाणची पिके पावसावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यात ऊस लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यातील ऊस गाळपाचा प्रश्‍न सुकर व्हावा; म्हणून सुरुवातीला दामाजी कारखान्याची उभारणी करण्यात आली. त्यानंतरही तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी परिचारकांनी कचरेवाडी येथे युटोपियन या खासगी साखर कारखान्याची उभारणी केली. तसेच भाऊसाहेब रुपनर यांनीही फॅबटेक कारखाना सुरू केला. माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही लवंगी येथे भैरवनाथ शुगर हा खासगी कारखाना सुरू केला.

 Laxman Dhoble-Jayant Patil
शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा; सोडू नका : पूनम महाजनांचा आक्रमक पवित्रा!

एक सहकारी व तीन खासगी कारखान्यांमुळे मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना सध्या नंदूरचा फॅबटेक कारखाना हा बंद आहे. चांगल्या पावसामुळे तालुक्यात यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी ऊस नेता का ऊस, असे म्हणण्याची वेळ आली आहे. युटोपियन कारखान्याने सर्वाधिक चार लाख टनापेक्षा जादा ऊस गाळपासाठी नेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. भैरवनाथ कारखान्यानेही तीन लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले आहे. तालुक्यातील एकमेव सहकारी असलेल्या दामाजी कारखान्याने अडीच लाख टन उसाचे गाळप केले आहे. उपपदार्थनिर्मिती नसतानाही आमदार समाधान आवताडे यांनी पाच वर्षांत एकही हंगाम बंद न ठेवता कारखाना चालवून दाखवला आहे. सलग पाच वर्षे कारखाना चालू ठेवणारे ते अध्यक्ष ठरले आहेत.

 Laxman Dhoble-Jayant Patil
वाद पेटला : पूनम महाजनांनी थेट ठाकरे परिवाराला घेतले शिंगावर

शिवाजी काळुंगे यांनी सीताराम कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेला आहे. शेतकऱ्यांना आपला ऊस गाळपास न्यावा; म्हणून टोळ्यांची मनधरणी करावी लागत आहे, यासाठी प्रतिएकरी पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय आपल्याच जनावरांना वाढ्यासाठी स्वतःच्याच शेतातील पेंड्या मोजून घेण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जत येथील कारखान्याने शिरनांदगी परिसरातील ऊस गाळपास नेताना त्या ऊसाला इतर कारखान्यांपेक्षा तीनशे रुपये अधिकचा दर दिला आहे.

 Laxman Dhoble-Jayant Patil
आमदार महेश लांडगेंचे मोठे धाडस; थेट शरद पवारांवरच केली टीका

जादा दराच्या धागा पकडून भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना आपल्या खास शैलीत साखर कारखानदारांना चिमटे घेत तालुक्यातील अतिरिक्त उसाबाबत आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांनी सहसंचालकांना जागे करण्याचे आवाहन केले. युटोपियन, भैरवनाथ, दामाजी, सीताराम, फॅबटेक हे पाच पांडव गुण्यागोविंदाने शेतकऱ्याला सेवा देणारी मंदिरे मंगुडयात नांदत आहेत. कामगारांना पगार आणि शेतकऱ्यांना भाव  देणाऱ्या शिवारात आपली मुलगी देताना मुलीच्या बापाला समाधान वाटावे, असेच वातावरण तालुक्यात नांदत आहे. पण, या कारखाना मालकांनी ठरवून 1800 ते 2000 भाव दिला असताना राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी टनाला 2400 रुपये देवून अतिरिक्त प्रेम व्यक्त केले केले. ही ‘म्हैसाळ’च्या पाण्याची करामत आहे, अशी गुगलीही त्यांनी यावेळी टाकली.

 Laxman Dhoble-Jayant Patil
सोनियाजींनी विकृती खपवून घेऊ नये; मि. नटवरलाल पटोलेंना मनोरुग्णालयात पाठवावे…

दरम्यान, दामाजी कारखान्याच्या मागील निवडणुकीत माजी मंत्री ढोबळे यांनी समाधान आवताडे यांना मदत करताना लक्ष्मण नरोटे व अशोक केदार यांना संचालकपद मिळवून दिले होते. अतिरिक्त उसावरून ढोबळे यांनी पुढाकार घेत कधी कौतुक, कधी चिमटे घेत आपल्या खास शैलीत साखर कारखानदारांचा समाचार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com