Vishalgad violence : मागील आठवड्यात विशाळगड येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात आपले म्हणणे सादर केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी विशाळगड हिंसाचार प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. पण मुसळधार पाऊस आणि गडावरील धुक्यामुळे कमी दृश्यमानामुळे किल्ले विशाळगडावरील हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करू शकलो नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस (Police) निरीक्षक विजय घेराडे यांनी दिली. न्यायाधीश बी.पी. कुलाबावाला व न्यायाधीश फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राज्यसभेचे माजी सदस्य संभाजीराजे छत्रपती यांच्यासह रवींद्र पडवळ, बंडा साळुंखे यांच्यासह ज्ञात अज्ञात 1500 लोकांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ही न्यायालयात देण्यात आली. विशाळगडावरील अतिक्रमण धारक यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर 19 जुलै रोजी कायदा आणि सुव्यवस्थेवरून उच्च न्यायालयाने कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांना फटकारले होते. त्यानंतर सोमवारी दुसरी सुनावणी पार पडली.
14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी विशाळगडावरील काही रहिवासांनी याचिकेद्वारे केली होती. दरम्यान, सरकारी वकिलांनी प्रशासन पावसाळ्यात कोणतेही रहिवाशी अतिक्रमण तोडणार नाही, असे सरकारी परिपत्रक यापूर्वीच दाखल केल्याने आणि तशी हमी उच्च न्यायालयाला दिली. त्यासंदर्भात महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायाल्यासमोर सांगितले की, गडावरील कोणतेही रहिवाशी बांधकाम तोडले नाही. ज्या व्यावसायिक बांधकामावर स्थगिती नाही, असे 95 बांधकामे स्थानिक रहिवाशी यांच्या मदतीने काढली आहेत. अशी माहिती दिली.
यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांची घरे शाबूत आहेत की नाही?' असा प्रश्न विचारताच सराफ यानी नकारात्मक उत्तर दिले. कारवाई संदर्भात पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडत होता. परिणामी, विशाळगडावर धुके होते. त्यामुळे कमी दुश्यमानतेमुळे पोलिस योग्य ती कारवाई करू शकले नाहीत. पण अशा परिस्थितीत गजापूर चेकपोस्टजवळ कायदा व
सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील होते. त्यातील काही जणांनी हवामानाचा फायदा घेत शस्त्रे घेऊन गडावर गेले. त्यांनीच हा हिंसाचार केला त्यात पोलिस देखील जखमी झालेत. शिवाय 14 जुलै रोजी पवनखिंड शौर्य दिवस असल्याने त्याचा फायदा घेत अनेकजण विशाळगडावर गेले असल्याचे पत्रात नमूद आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.