Sangli Loksabha Constituency: विश्वजीत कदमांचा सूचक इशारा! म्हणाले, 'सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यास..'

Vishwajeet Kadam News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'थेट मुहूर्त' लावण्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

Sangli Loksabha Election 2024 : मागील काही दिवसांपासून पलूस कडेगावचे आणदार विश्वजीत कदम यांच्याबाबत राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं बोलल्या जात आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे क्रमांक एकचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजीत कदमांना थेट मुहूर्त लावतो, असं म्हणणं. खरंतर यावर विश्वजीत कदमांकडून खुलासाही आला आहे. परंतु आता त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळू नये, यासाठी काहीजण कार्यरत आहेत, ते सर्वांना ज्ञात आहे. चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी अद्याप जागावाटप झालेले नाही. काँग्रेसलाच ही जागा मिळेल आणि मिळाली नाही तर जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते एकत्रित बसून निर्णय घेऊ, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम(Vishwajeet Kadam) यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishwajeet Kadam
Chandrahar Patil Join Shivsena UBT : 'अब की बार चंद्रहार!' सांगलीसाठी ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पाटील उमेदवार

दुष्काळी प्रश्नांवर काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानंतर आमदार कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार कदम म्हणाले, लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्व नेत्यांकडे आग्रह धरत आहे. पण सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून काही लोक प्रयत्न करत आहेत. पण आम्ही उमदेवार ठरवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना देखील बोललो आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जागा काँग्रेसलाच राहील, असा शब्द दिला आहे.

सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील(Chandrahar Patil) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत विचारले असता विश्वजीत कदम म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षात कोणाला घ्यावे कोणाला घेऊ नये, हा ज्यांचा त्यांचा निर्णय आहे. मात्र जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा निर्णय अजून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

तर एकत्रित बसून निर्णय घेऊ -

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही तर 2009 मध्ये जत मध्ये काँग्रेस विसर्जित करून विरोधी पक्षाचे काम करण्याचा पॅटर्न राबवला गेला. तोच पुन्हा सांगली लोकसभेत राबवला जाईल, असा इशारा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला आहे. याबाबत आमदार कदम म्हणाले, ते विक्रम सावंत यांचे वैयक्तिक मत असेल. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. मात्र त्यामध्ये काही बदल झालाच तर काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते एकत्रित बसून निर्णय घेतील.

Vishwajeet Kadam
Kolhapur News : सदाभाऊंचं गाऱ्हाणं भाजप ऐकणार.. ? हातकणंगलेच्या जागेसाठी रयत संघटना आग्रही

झारीतील शुक्राचार्याचा प्रयत्न हाणून पडेल : विशाल पाटील

लोकसभेची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून पडद्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचा समाचार पक्षश्रेष्ठी घेतील. पण आता जनतेतून आवाज येत आहे. जनता सगळ्या डावांना ओळखून आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. यावेळी काँग्रेस एकसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळेल, यात काही अडचण नसल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com