राष्ट्रवादीचं ठरलं नाईक होणार अध्यक्ष; विश्वजित कदम ठरवणार काँग्रेसचा उपाध्यक्ष!

सांगली जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष निवडीचे अधिकार काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना
 Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या (Sangli District Bank) अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. आता काँग्रेसच्या (congress) उपाध्यक्षपदाची उत्सुकता असून निवडीचे अधिकार सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. (Vishwajeet Kadam of Congress has the right to elect the Vice President of Sangli District Bank)

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. विरोधी भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलने चार जागा राखत ताकद दाखवली आहे. निवडणुकीत महाआघाडीतील राष्ट्रवादीला ९, काँग्रेसचे ४ तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत.

 Vishwajeet Kadam
अध्यक्षपदासाठी रोहिणी खडसेंचे नाव पुढे आले; पण...

अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा असून आमदार नाईक हे प्रबळ दावेदार मानले जातात. अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा असला तरी कॉंग्रेसनेही शेवटची दोन वर्षे अध्यक्षपद मागितले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही अध्यक्षपद आधी काँग्रेसला घ्यायचे की नंतर घ्यायचे तसेच उपाध्यक्षपद आधी घेतले तर संधी कोणाला द्यायची याबाबतचे सर्वाधिकार राज्यमंत्री कदम यांना देण्यात आले आहेत.

 Vishwajeet Kadam
जिल्हाप्रमुख चांदेरेंची शिवसेनेतून हकालपट्टी करा : भोरपाठोपाठ वेल्ह्यातील शिवसैनिकही आक्रमक

राज्यमंत्री कदम यांनी अद्याप याबाबत जिल्हा बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांशी चर्चा केलेली नाही. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्यमंत्री कदम आणि आमदार अनिल बाबर यांच्यातही चर्चा झालेली नाही. त्यामुळे चर्चेनंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. अध्यक्षपदी आमदार नाईक यांच्यावर शिक्कामोर्तब झाले असून घोषणा फक्त बाकी आहे.

 Vishwajeet Kadam
माजी आमदार दळवींच्या नाराजीची 'मातोश्री'कडून दखल; राष्ट्रवादीतील प्रवेश रोखला

दुसरीकडे काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार असून कोणाला बहुमान मिळणार, याची उत्सुकता आहे. भविष्यात काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार असल्याची शक्यता असेल तर विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील व महेंद्र लाड हे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यामुळे उपाध्यक्षपद सध्या जयश्री पाटील यांना मिळणार हे निश्‍चित आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम ६ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे शनिवारी किंवा रविवारी बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com