विठ्ठल कारखाना : अस्तित्वासाठी लढणाऱ्या भगीरथ भालकेंना अभिजित अन्‌ युवराज पाटलांचे आव्हान

विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक जाहीर : पाच जुलै रोजी मतदान; तर सहा जुलैला निकाल लागणार
vitthal sugar factory
vitthal sugar factory Sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे. कारखान्याच्या एकूण २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी ३ ते ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ता ५ जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान, तर ६ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. कारखाना निवडणूक कार्यक्रमाविषयी आज येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून अधिकृत माहिती देण्यात आली. (Vitthal Sugar Factory election announced; Voting on July 5)

विठ्ठलची ही निवडणूक कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या अस्तित्वाची, तर अभिजीत पाटील व युवराज पाटील यांच्या प्रतिष्ठेची ठरणारी आहे. कोरोनोमुळे तब्बल दीड वर्षे निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर अखेर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून ‘विठ्ठल’च्या निवडणुकीच्या निमित्ताने बैठका, मेळावे, सभा सुरु आहेत. त्यातच निवडणूक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

vitthal sugar factory
‘जयसिद्धेश्वर महाराजांना डिस्टर्ब करण्यासाठी मी सोलापुरात येणार नाही’

डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभा करुन निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही पाटलांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके गटात अजूनही शांतता आहे. दरम्यान, ता. २ जुलै रोजी भालके, काळे गटाच्या कार्यकर्त्यांची पहिली बैठक बोलवली आहे. या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका मांडतात, याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

vitthal sugar factory
'मुन्ना महाडिक ताकदवान उमेदवार; नक्की जिंकतील'

असा असेल निवडणूक कार्यक्रम

3 ते 9 जुलै उमेदवारी अर्ज दाखल करणे

10 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी

13 जुलै रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द

13 ते 27 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे

28 जून रोजी चिन्हाचे वाटप

5 जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान

6 जुलै रोजी निवडणूक निकाल

vitthal sugar factory
कृषी कायदे परत आणण्याबाबत सरकार नक्की विचार करेल : केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान

अकरा गटातील 21 जागांसाठी मतदान

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 25 हजार 392 सभासद मतदार पात्र आहेत. या सभासदांमधून 11 गटातील 21 संचालकांची निवड केली जाणार आहे. भाळवणी गट-3, करकंब गट-3, मेंढापूर गट- 2, तुंगत गट-2, कासेगाव गट-3, सरकोली गट-2, सहकारी संस्था गट-1,अनुसूचित जाती जमाती -1, महिला-2, इतर मागासवर्गीय प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती जमाती-1.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com