Abhijeet Patil-Rohit Pawar
Abhijeet Patil-Rohit PawarSarkarnama

Pawar Politic's : पवारांचा फडणवीसांना पुन्हा धोबीपछाड; पंढरपुरातील बड्या नेत्याने घेतली रोहित पवारांची भेट!

Abhijeet Patil Meet Rohit Pawar : पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे माढा मतदारसंघात नव्या राजकीय घडामोडी वेगात घडत आहेत.
Published on

Pandharpur, 04 October : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुलाला अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माढ्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत.

लोकसभा निवडणुकीत साथ सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर भाजपच्या गोटात गेलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या जवळ गेलेले अभिजीत पाटील पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी आज (ता. 04 ऑक्टोबर) आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकिट न मिळाल्यास माझा मुलगा रणजितसिंह शिंदे हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवेल, असे पंढरपूरमध्ये बोलताना स्पष्ट केले.

आमदार बबनराव शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे माढा मतदारसंघात नव्या राजकीय घडामोडी वेगात घडत आहेत. या घडामोडी महायुतीला धक्का पोचविणाऱ्या आहेत. विशेषतः अजित पवारांचे नुकसान करणाऱ्या ठरू शकतात.

Abhijeet Patil-Rohit Pawar
Babanrao Shinde : बबनदादा अजितदादांनाही धक्का देणार; मुलाला माढ्यातून अपक्ष निवडणुकीला उतरवणार...

पंढरपुरात बोलताना आमदार बबनराव शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे. त्यानंतर माढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले अभिजीत पाटील यांनी आज दुपारी अरण येथे जाऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. रोहित पवार हे अरण येथे एका कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांची अभिजीत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली.

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अभिजित पाटील यांना लोकसभा निवडणुकीपासून ओळखले जात होते. ऐन लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ सोडून पाटील हे भाजपसोबत गेले होते. त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या थकहमीनंतर 348 कोटी रूपयांचे एनसीडीसीचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. त्या वेळीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली आहे.

Abhijeet Patil-Rohit Pawar
Prakash Shendge : आदिवासींचे आम्हाला काही नको; पण बारामतीसुद्धा राखीव होईल : धनगर नेत्याने मांडली भूमिका

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील हे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच बबनराव शिंदे यांच्या भूमिकेनंतर अभिजीत पाटील यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्याने शरद पवार कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com