VJNT committee Tour : ....तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांवर प्रशासक नेमण्याची शिफारस करणार : व्हीजेएनटी समितीचा इशारा

Suhas Kande Warning : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळा बंद कराव्यात, असे वाटते. आश्रमशाळांच्या चालकांना मदत देतोय, ते आम्ही पाप करतोय, असं वाटतंय.
VJNT committee
VJNT committee Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 August : विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने (व्हीजेएनटी) सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले. ज्या आश्रमशाळांत अनियमितता आढळली आहे, त्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. एका शाळेतील शिक्षकांची वेतनवाढ रोखली, तर एका शाळेवर तातडीने प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. जितका मोठा नेता असेल, तितकी मोठी कारवाई संबंधित नेत्यांच्या शाळेवर होईल, असा इशाराही या समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांची व्हीजेएनटी समितीने ( VJNT committee) पाहणी केली आहे. त्यातील बऱ्याच शाळांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. यात पायाभूत आणि भौतिक सोयी-सुविधांची कमतरता आढळून आली. काही बोटावर मोजण्याइतक्या संस्थां छान काम करत आहेत. नागणहळ्ळी येथील आश्रमशाळेचे इतरांनी अनुकरण केले तर चांगलं होईल, असे सांगितले.

व्हीजेएनटी समितीला सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांच्या कामकाजात अनियमितता आढळून आलेली आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील आश्रमशाळा संचालकांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. कांदे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळा बंद कराव्यात, असे वाटते. आश्रमशाळांच्या चालकांना मदत देतोय, ते आम्ही पाप करतोय, असं वाटतंय.

संस्थाचालक हे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा देत नाहीत, त्यामुळे आम्ही तीन महिन्यांची मुदत दिलीय. आम्ही पुन्हा एकदा दौरा करणार आहोत. आमची व्हीजेएनटी समिती या संस्थाचालकांना धडा शिकविणार आहे. हे सुधारले नाहीत, तर आम्ही सर्व आश्रम शाळांवर प्रशासक नेमणार आहोत, असेही कांदे यांनी सांगितले.

VJNT committee
Varah Jayanti : अमोल मिटकरींचा नीतेश राणेंना सल्ला; ‘वराह जयंतीची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी’

मंगळवेढा येथील आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधा नव्हत्या. वसतिगृह, शालेय पोषण आहारात तफावत आढळून आली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत खूप वाईट परिस्थिती आहे. विद्यार्थी सोडा शिक्षकांना देखील माहिती नाही, त्यामुळे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला आम्ही निलंबित करतोय, शिक्षकांची पगारवाढ रोखणार आहोत.

कोणत्याही आमदार, खासदार, मंत्री, आमच्या पक्षाचा असो वा दुसऱ्या पक्षाचा असो आम्ही कारवाई करणार आहोत. त्या कोणाचाही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही, असे कांदे यांनी सांगितले. ते सांगताना त्यांनी आम्ही सर्व शाळांना लेखी आदेश दिले आहेत. जितका मोठा नेता, तितकी मोठी कारवाई संबंधित नेत्यांच्या शाळेवर होईल, असा इशाराही दिला आहे.

VJNT committee
Vote Chori : 'सीएसडीएस'च्या संजयकुमारांविरेाधात गुन्हा दाखल होताच पटोलेंनी टायमिंग साधलं; म्हणाले ‘त्या कारणामुळे काँग्रेसच्या आरोपांना बळच’

जो व्यक्ती आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या वाट्याचे अनुदान लाटण्याचे काम करेल, त्यांना आम्ही सोडणार नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी कामाची मोकळीक दिलेली आहे, असे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com