Solapur-Mumbai Air Service : सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेसाठी महायुती सरकारचा ‘बूस्टर डोस’; सोलापूरकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

Mahayuti Government Decision महायुती सरकारच्या निर्णयामुळे सोलापूरकरांची मुंबईला विमानाने जाण्याची स्वप्नपूर्ती होणार आहे. सोलापूर-पुणे-मुंबई या विमानसेवेमुळे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
Solapur-Mumbai Air Service
Solapur-Mumbai Air ServiceSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 August : सोलापूर-गोवा विमानसेवेनंतर आता सोलापूर-मुंबई विमानसेवेची सोलापूरकरांची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला असून या विमानसेवेसाठी आर्थिक मदतीचा बूस्टर डोस दिला आहे, त्यामुळे सोलापूरकरांचे सोलापूर ते मुंबई विमानसेवेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज (ता. 12 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. त्या बैठकीत राज्य सरकारने सुमारे पंधरा हजार पोलिस भरतीस मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या दृष्टीनेही मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई प्रवासाकरिता व्हेबिलिटी गॅप फंडिंग (Viability Gap Funding) देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नऊ जून रोजी सोलापूर-गोवा प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे. ही विमानसेवा प्लाय 91 (Fly91) या कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी ऑगस्ट महिन्यात सोलापूर-मुंबई विमानसेवा (Solapur-Mumbai Air Service) सुरू होईल, अशी घोषणा केली होती.

सोलापूर-मुंबई या विमानसेवेसाठी स्टार एअरलाईन्स या खासगी विमान कंपनीला भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (BGCA) अधिकृत परवानगी मिळाली आहे. स्टार एअरलाईन्सच्या विमानात एकूण 78 आसनांची व्यवस्था असणार आहे.

Solapur-Mumbai Air Service
RPI Leader Extortion Case : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाच्या नेत्याला खंडणीप्रकरणी अटक; राजकीय क्षेत्रात खळबळ!

सोलापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवातीच्या काही दिवसांत कमी प्रतिसाद मिळाला तर संबंधित विमान वाहतूक कंपनीस राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई प्रवासाकरिता व्हेबिलिटी गॅप फंडिंग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सोलापूर-पुणे-मुंबई ही विमानसेवा प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देणारी ठरणार आहे. ही सेवा सोलापूरच्या दृष्टीने मोठी संधी ठरणार असणार आहे. या विमानसेवेचा उद्योग, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Solapur-Mumbai Air Service
Bharat Gogawale : भरत गोगावलेंच्या पालकमंत्रिपदासाठी सोलापूरचा शिवसेना पदाधिकारी आक्रमक; रक्ताने लिहिले एकनाथ शिंदेंना पत्र

व्हेबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे काय?

व्हेबिलिटी गॅप फंडिंग (VGF) योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या योग्य असलेल्या परंतु आर्थिक व्यवहार्यतेपासून किंचित कमी असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देणे आहे. ज्या क्षेत्रात स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे खासगी क्षेत्रातील प्रायोजकांची निवड केली जाते, अशाच सुविधांच्या प्रकल्पांना या योजनेंतर्गत मदत करण्यात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com