Wai Nagar Parishad Results : मकरंदआबांना वाईकरांनी दाखवला कृष्णेचा घाट : नगराध्यक्षपद पुन्हा टप्प्याबाहेर; नगरपालिकाही काठावर जिंकली

Anil Sawant Nagaradhyaksha Vs Makrand Patil : नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन कदम, भाजपचे अनिल सावंत, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रदीप जायगुडे आणि अपक्ष दीपक जाधव अशी चौरंगी लढत झाली
makrand patil
makrand patilsarkarnama
Published on
Updated on

Wai Nagar Parishad News : अत्यंत चुरशीच्या झालेल्या थेट नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल सावंत २१५९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांना १२ हजार २८१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन कदम यांना १० हजार १२२ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदासह दहा सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ व एक बिनविरोध असे १२, तर एक अपक्ष सदस्य निवडून आले.

या निकालानंतर नगराध्यक्षपद आपल्या ताब्यात घेण्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. मात्र नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत झाले आहे. 22 पैकी 12 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर भाजपला दहा जागांवर आणि अपक्ष एका जागेवर विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळाला नाही.

मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, धैर्यशील कदम, माजी आमदार मदन भोसले, महिला आघाडी अध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप या महायुतीतील मित्रपक्षांमध्ये पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी अटीतटीची लढत झाली.

makrand patil
Navapur Nagar Parishad Result: नवापुरात अजितदादांची जादू; नंदुरबारमध्ये शिदेंनी मैदान मारलं; महायुतीचं पारडे जड

अशी पार पडली निवडणूक

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन कदम, भाजपचे अनिल सावंत, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रदीप जायगुडे आणि अपक्ष दीपक जाधव अशी चौरंगी लढत झाली. तर 11 प्रभागातील 22 सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 22, भाजपचे 18 व 1 पुरस्कृत, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 5, काँग्रेस 1 आणि अपक्ष 7 असे एकूण 61 उमेदवार रिंगणात होते.

अनिल सावंत यांची आघाडी...

नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत पहिल्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन कदम 72 मतांची, तर दुसऱ्या प्रभागात भाजपचे अनिल सावंत यांनी 416 मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या प्रभागात 237 व चौथ्या प्रभागात 300 मतांची नितीन कदम आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर अनिल सावंत यांनी पाचव्या प्रभागात 477 मतांची आघाडी घेतली. तेथून प्रत्येक प्रभागात दीडशे ते तीनशे मतांनी वाढत राहिली.

नगराध्यक्षपदी पुन्हा भाजपचा विजय

नगरपालिकेच्या मागील सभागृहात थेट नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे अवघ्या एका मताने विराजमान झाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे 14 व भाजप, काँग्रेस, शिवसेना यांच्या वाई विकास आघाडीचे 6 असे नगरसेवक होते. यंदा पुन्हा नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार आणि नगरपालिका राष्ट्रवादीकडे असे चित्र तयार झाले आहे.

‘‘हा विजय समस्त वाईकरांना समर्पित करतो. या सर्वांचा आयुष्यभर ऋणी राहून शहराच्या विकासासाठी व चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध राहीन. विरोधक अथवा कोणाचा द्वेष, मत्सर करून अपमान करणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे.', असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले.

नगराध्यक्षांना सहकार्य करू

मकरंद पाटील म्हणाल्या, वाईत नागरी विकासाच्या योजना राबविताना जनतेच्या दैनंदिन समस्या सोडविताना आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील. त्यामुळे नगराध्यक्षपदी आमचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मंत्री, लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष नगरसेवकांना आवश्यक ते सहकार्य करू.

makrand patil
Latur Political News : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर,भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा हातही झाला दुबळा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com