Solapur Politic's : दोन्ही देशमुखांबाबत पालकमंत्री गोरेंचा मोठा दावा; ते म्हणाले, ‘आम्ही खूप कॉर्डिनेशनमध्ये...’

Jaykumar Gore Statement : दोन्ही देशमुखांच्या गैरहजेरीवरून पालकमंत्री गोरे यांना प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळी गोरे यांनी ‘आज फक्त मंडल अध्यक्षांची बैठक होती. या बैठकीला आमदारांची हजेरी अपेक्षित नव्हती, असे स्पष्ट केले.
Jaykumar Gore-Vijaykumar Deshumkh -Subhash Deshmukh
Jaykumar Gore-Vijaykumar Deshumkh -Subhash DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 July : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून भाजपचे वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे पक्षावर विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर नाराज आहेत. पालकमंत्र्यांच्या एकाही बैठकीला हे दोन्ही उपस्थित राहत नाहीत, हे गेली दोन तीन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत पालकमंत्री गोरे यांनी मोठा दावा केला असून दोन्ही देशमुखांसोबत माझ्या भरपूर बैठका होतात, आम्ही खूप कॉर्डिनेशनमध्ये आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे सोमवारी (ता. 28 जुलै) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंडल अध्यक्षांची बैठक घेतली. त्या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख मात्र गैरहजर होते.

दोन्ही देशमुखांच्या गैरहजेरीवरून पालकमंत्री गोरे यांना प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळी गोरे यांनी ‘आज फक्त मंडल अध्यक्षांची बैठक होती. या बैठकीला आमदारांची हजेरी अपेक्षित नव्हती. जे आमदार माझ्यासोबत आहेत, त्यांना घेऊन देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांच्या कार्यक्रमाला निघालो आहे, असे स्पष्ट केले.

आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Gore) आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील मंडल अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते. दोन्ही देशमुखांबाबत पत्रकारांना पूर्ण माहिती मिळत नाही, त्यांच्या माझ्यासोबत भरपूर बैठका होतात, आम्ही खूप ‘कॉर्डिनेशन’मध्ये आहोत, असाही दावा ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केला.

Jaykumar Gore-Vijaykumar Deshumkh -Subhash Deshmukh
Anjali Damania : ‘खडसेंचा मला किती तिटकरा...त्यांनी मला छळ छळ छळले; पण खेवलकरांच्या अटकेला राजकीय वास’; अंजली दमानिया मनातील बोलल्या

पालकमंत्री गोरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात बंद दाराआड झालेल्या बैठकीची माहिती मीडियाला दिली कसं होणार, असा सांगून त्यांनी निवडणूक रणनीतीबाबत बोलणे टाळले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशी रणनीती आखली पाहिजे, या संदर्भात मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली. डीपीसीच्या निधी वितरणासंदर्भात चर्चा झाली.

Jaykumar Gore-Vijaykumar Deshumkh -Subhash Deshmukh
Pune Rave Party : डॉ. प्रांजल खेवलकरांबाबतचे गूढ वाढले; वैद्यकीय अहवालाबाबत रोहिणी खडसेंचा वेगळाच दावा

आगामी निवडणूक कशी लढता येईल, या संदर्भात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. निवडणूक कशा पद्धतीने लढावी, यासाठी वरिष्ठ यंत्रणा आहे. वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील, त्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातील. स्थानिक पातळीवरचे समीकरण वरिष्ठांच्या लक्षात आणून दिले जाईल. महायुतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील आणि तो निर्णय या पातळीवर होत नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com