'आम्ही भाजपचे, पण दमदाटीमुळे माघार घ्यावी लागली' : कर्जतमध्ये पुन्हा राजकीय नाट्य

भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजप उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप केला होता.
Ram Shinde, Rohit Pawar

Ram Shinde, Rohit Pawar

Sarkarnama

Published on
Updated on

अहमदनगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत दोन प्रभागांतील भाजपच्या उमेदवारांनी, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज माघारी घेतले होते. यावर भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजप उमेदवारांना दमदाटी करून अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कर्जतमध्ये आज पुन्हा नवीन राजकीय नाट्य पहायला मिळाले. 'We belong to BJP, but had to withdraw due to pressure': Political drama again in Karjat

भाजप उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्यावर राम शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करत गोदड महाराज मंदिरासमोर मूक आंदोलन केले होते. प्रभाग दोनमध्ये भाजपने दोन महिला उमेदवारांना एबी फॉर्म दिला होता. त्यात माजी नगरसेविका नीता अजिनाथ कचरे व पूजा अनिल कचरे यांचा समावेश होता. या दोघींनीही सोमवारी ( ता. 13 ) उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

<div class="paragraphs"><p>Ram Shinde, Rohit Pawar</p></div>
भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज माघारी : रोहित पवार समर्थकांनी खेळला गुलाल

या प्रकाराला तीन दिवस उलटल्यावर भाजपचे उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या पूजा कचरे यांचे पती व नीता कचरे यांचे दीर अनिल कचरे यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दमदाटी झाल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या ( शुक्रवारी ) कर्जतमध्ये राष्ट्रवादी तर्फे एक प्रचार सभा होणार आहे. या सभेत मंत्री धनंजय मुंडे व गुजरातचे हार्दिक पटेल यांची भाषणे होणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Ram Shinde, Rohit Pawar</p></div>
राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

अनिल कचरे यांनी म्हटले आहे की, कर्जतच्या प्रभाग 2 मधून माझ्या पत्नीचा व भावजयीचा उमेदवारी अर्ज भरला होता. आम्हा भाजपला मानणारी माणसं आहोत आणि भाजपला कधी विसरणारही नाही. भाजपचे आमच्यावर भरपूर उपकार आहेत. कारण आम्ही राम शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते आहोत. राम शिंदे यांचे उपकार आम्ही शेवटपर्यंत विसरू शकत नाही. त्यांनी गोरगरिबांसाठी रानावनात आणि वाडीवस्तीवरील सर्वसामान्यांच्या लग्न, मृत्यू अशा कार्यक्रमात हजर राहिले. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यामुळे आम्ही प्रभाग 2मधून माझ्या पत्नीचा व भावजयीचा उमेदवारी अर्ज भरला होता.

कचरे पुढे म्हणाले, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ते लोक आमच्या घरी येऊन माझी पत्नी व भावजयीला घेऊन गेले. तिथे येऊन दमदाटी केली. आम्हाला याचा तपास लागू दिला नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज एक, दोन कारणे देऊन काढून घेतला, असे अनिल कचरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com