Vaibhav Pichad on Kiran Lahamate: लहामटेंच्या भविष्यात काय लिहिलयं माहीत नाही; पिचडांचे सूचक विधान

Ahmednagar Politics : आ.लहामटे यांनी तळ्यात-मळ्यात करत शेवटी अजित पवार यांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला याचा आनंद आहे.
Kiran Lahamate|  Vaibhav Pichad
Kiran Lahamate| Vaibhav Pichad Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar NCP Politics : भविष्यात काय लिहून ठेवले माहीत नाही, पण अडीच वर्ष ठप्प झालेला विकास मागील एक वर्षांपासून शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सुरू झाला, आता तळ्यात-मळ्यात करत का होईना आ. किरण लहामटे मतदारसंघाच्या विकास कामांसाठी अजित पवारांच्या सोबत सरकारमध्ये आलेले आहेत. त्यांनी मतदारसंघाच्या विकासकामांसाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल आनंद आहे. असे सूचक वक्तव्य माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे. भविष्यात काय लिहून ठेवले माहीत नाही, असं म्हणत वैभव पिचड अशी भूमिका वै

उपमुख्यमंत्री पद आणि आठ कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेत अजित पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार मधे सहभागी झाल्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार असे महायुतीचे सरकार बनले आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुका अर्थातच महायुती एकत्रपणे महाविकास आघाडीच्या विरोधात लढणार असे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीसाठी तयारीत असलेल्या इच्छुकांचे काय असा प्रश्न समोर येत आहे.

Kiran Lahamate|  Vaibhav Pichad
NCP Crisis Update : राष्ट्रवादीत दक्षिण-उत्तरायण: शरद पवार बेंगळूरूत; तर अजित पवार दिल्लीला

असाच प्रश्न नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात पुढे येत आहे. 2014 विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस कडून वैभव पिचड निवडून आले. मात्र 2019 ला पिचड पिता-पुत्र भाजपमध्ये गेले. 2019 विधानसभेला पिचड यांना राष्ट्रवादी कडून निवडणुकीत उतरलेले डॉ.किरण लहामटे यांनी 57 हजारावर मतांनी पराभूत केले.

मात्र साडेतीन वर्षांनंतर नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील घडामोडींनंतर आ.किरण लहामटे अजित पवार यांच्या सोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे 2024 च्या उमेदवारी बद्दल आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. यानिमित्ताने भाजपात असलेले माजी आमदार वैभव पिचड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हवाला देत देश आणि राज्य भाजपच्या हातात सुरक्षित असल्याची आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप सोबत येणे गरजेचे असल्याची सद्सद्विवेकबुद्धी असल्यानेच आ.लहामटे अजित पवारांसोबत सरकार मधे सहभागी झाल्याचे म्हंटले आहे.

Kiran Lahamate|  Vaibhav Pichad
Rahul Gandhi- Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची याचिका मंजूर; २१ जुलैला सुनावणी

या निमित्ताने वैभव पिचड यांनी पिचड परिवाराने 2014 मधे मतदारसंघाच्या प्रलंबित विकास कामांसाठी भाजप सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता असे सांगण्याचा प्रयत्न पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केला आहे. आ.लहामटे यांनी तळ्यात-मळ्यात करत शेवटी अजित पवार यांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला याचा आनंद आहे. त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामां साठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भाजप सरकार सोबत आल्याने ही कामे शक्य होणार आहेत, त्यासाठी अजितदादांची मदतच होईल असेही वैभव पिचड म्हणाले.

आ. किरण लहामटे यांनी समाजमाध्यमात एक पोस्ट करत अकोले मतदारसंघासाठी 96 कोटींचा निधी आणल्याचे सांगितले आहे. मात्र मतदारसंघातील कामांना मंजुरीसाठी आपलेही शासन दरबारी प्रयत्न असल्याचे सांगताना मात्र आपल्याला हा वादाचा विषय होऊ द्यायचा नाही अशीही पृष्ठी पिचड यांनी केली. मविआ सरकारच्या सुरुवातीच्या अडीच वर्षात एकही काम लोकप्रतिनिधी आणू शकले नाही. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तालुक्याला निधी आणता आला. आता भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे माहीत नाही मात्र अडीच वर्षे ठप्प झालेला विकास मागील एकवर्षापासून सुरू झाल्याचे सूचक असे विधान वैभव पिचड यांनी केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com