Rahul Gandhi - Supreme Court : कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. राहूल गांधी यांच्यावर 10 गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात काहीही चुकीचे नाही, असे स्पष्ट करत गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळळी होती. याविरोधात राहूल गांधी यांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली.
ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली असून शुक्रवारी (२१ जुलै) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मोदी आडनावाशी संदर्भात केलेल्या विधानाप्रकरणी सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.
15 जुलै रोजी राहुल गांधी यांनी मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जी आज मंजूर झाली. गुजरात हायकोर्टाने 7 जुलै रोजी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी त्यांची पुर्नविचार याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. राहुल गांधी यांनी सादर कलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
राहुल गांधी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी २१ जुलै किंवा २४ जुलै रोजी अपीलाची यादी मागितल्यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. त्यावर २१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.
राहूल गांधी याचिकेत हे दावे केले आहेत
-15 जुलै रोजी दाखल केलेल्या अपीलात राहुल यांनी निर्णयाला स्थगिती न दिल्यास भाषण, अभिव्यक्ती, मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल, असे म्हटले आहे.
-उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर पद्धतशीरपणे, लोकशाही संस्थांचे वारंवार नुकसान होईल आणि परिणामी लोकशाहीचा गळा घोटला जाईल, जे भारताच्या राजकीय वातावरणासाठी आणि भविष्यासाठी गंभीरपणे हानिकारक असेल.
राहूल गांधी यांच्या वक्तव्यामुळे मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा करत भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना तीन वेळा न्यायालयातही हजर राहिले. त्यांनी निवडणुकीच्या सभेत असे वक्तव्य केल्याचे सांगितले होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.