Bhalke Meet KCR : ‘केसीआर’ यांना भेटलो; पण अजून BRSमध्ये प्रवेश केलेला नाही, सर्वांशी चर्चा करूनच निर्णय, भगीरथ भालकेंची भूमिका

तत्पूर्वी आमचे (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा करणार आहे
Bhagirath Bhalke Meet KCR
Bhagirath Bhalke Meet KCR Sarkarnama
Published on
Updated on

Solapur : तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, मी अजूनही भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेला नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर मी भालके यांना मानणारे पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आणि विठ्ठल परिवारातील नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी आमचे (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगीरथ भालके यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. (We Meet 'KCR'; Not yet entered BRS : Bhagirath Bhalke)

पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे काल सकाळी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पाठविलेल्या विशेष विमानातून पुण्याहून तेलंगणाला गेले होते. ते विमान खरं तर सोलापूरच्या विमानतळावर येणार होते. मात्र, चिमणीच्या अडथळ्यामुळे त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भालके यांना पुण्याला जावे लागले. त्यामुळे त्यांचा दौरा लांबला होता.

Bhagirath Bhalke Meet KCR
Solapur Politic's : राष्ट्रवादीच्या घाईने भगीरथ भालकेंना नेले तेलंगणातील ‘केसीआर’च्या दारी...!

भालके हे आपल्या कुटुंबासोबत हैदराबादला गेले होते. भालके यांना केसीआरपर्यंत पोचविण्यात बीआरएसचे मराठवाड्यात प्रमुख नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी महत्वाची भूमिका निभावली. भालके यांना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्यमंत्री केसीआर यांची भेट मिळाली. त्या भेटीत तेलंगणातील शासकीय योजनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भालके यांनी दिली असली तरी ते पंढरपूरचे बीआरएसचे उमेदवार आहेत, अशी माहिती आहे.

Bhagirath Bhalke Meet KCR
Bhagirath Bhalke News : राष्ट्रवादीला मोठा हादरा : भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला; भालकेंसाठी खास विमान पाठविले

त्या भेटीसंदर्भात भालके म्हणाले की, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी आम्ही बुधवारी सायंकाळी भेट झाली. त्या भेटीत त्यांनी तेलंगण सरकार शेतकऱ्यांविषयी राबवत असलेल्या योजनांसदर्भात माहिती दिली आहे. मी अजूनही बीआरएसमध्ये प्रवेश केलेला नाही. त्याबाबतचा निर्णय पंढरपूर आल्यानंतर प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून घेणार आहे. विठ्ठल परिवारातील नेत्यांशी याबाबत मी बोलणार आहे.

Bhagirath Bhalke Meet KCR
BRS News : २८८ मतदारसंघांमध्ये बीआरएसचे काम सुरू, तेलंगणा फॉर्म्यूला महाराष्ट्रात वापरणार!

महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेणार आहे. त्यांना या भेटीसंदर्भात माहिती देऊन चर्चा करणार आहे, त्यामुळे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात सर्वांशी चर्चाविनिमय केल्यानंतरच ठरविणार आहे, असेही भगीरथ भालके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com