Solapur Politic's : राष्ट्रवादीच्या घाईने भगीरथ भालकेंना नेले तेलंगणातील ‘केसीआर’च्या दारी...!

तेलंगणाहून खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यामुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या भालके यांना दहा हत्तीचे ‘बळ’ आले.
Abhijeet Patil-Sharad Pawar-Bhagirath Bhalke-KCR
Abhijeet Patil-Sharad Pawar-Bhagirath Bhalke-KCR Sarkarnama
Published on
Updated on

Solapur : पंढरपूर (Pandharpur) मतदारसंघात भालके नावाची ताकद राखून असलेले भगीरथ हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या प्रवेशानंतर उमेदवारीसंदर्भात भाष्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून घाई झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. कारण, पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेणारे भालके हे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे सध्याचे चित्र आहे. (Bhagirath Bhalke moved close to KCR because of NCP's overzealous stance)

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. केवळ प्रवेशच झाला नाही तर भाकरी फिरविण्याबाबत भाष्य झाले होते. त्यानंतर पवार यांनीही आपल्या भाषणात (स्व.)औदुंबरअण्णा पाटील, (स्व.) भारत भालके यांची उणीव भरून काढण्याची ताकद अभिजीत पाटील यांच्यात असल्याचे सांगून उमेदवारीचा विषय आला तर पाटील यांचे नाव घेतले जाईल, असे काम करा, असा सल्ला दिला हेाता. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घ्यायचा तो संदेश घेतला.

Abhijeet Patil-Sharad Pawar-Bhagirath Bhalke-KCR
Bhagirath Bhalke News : राष्ट्रवादीला मोठा हादरा : भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला; भालकेंसाठी खास विमान पाठविले

पवार यांच्या भाषणाचे पडसाद पंढरपूरच्या राजकारणात तातडीने उमटले. विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे, भगीरथ भालके (Bhagirath Bhalke), युवराज पाटील आणि गणेश पाटील यांनी सावध भूमिका घेतली. विठ्ठल परिवारातील या नेत्यांनी सोलापुरात येऊन पवारांची भेट घेतली. मात्र, फलनिष्पती झाली नाही. तेव्हापासून भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखून वागू लागले.

Abhijeet Patil-Sharad Pawar-Bhagirath Bhalke-KCR
Mangalveda Politics: पीए बदलून भालकेंची माणसं फुटायची नाहीत; गड्या तुला ते जमणार नाही, भगीरथ भालकेंचा आमदार आवताडेंना टोला

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या पाठिंब्याचे निमित्त साधून भगीरथ यांनी कुठल्याही परिस्थिती विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा केली. कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, याबाबत कोणते भाष्य केले नाही. पत्रकार परिषदेतही त्यांनी पक्षाचा उल्लेख केलाच नाही. त्यामुळे भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्याची मनाची पक्की तयारी केल्याचे दिसून आले.

Abhijeet Patil-Sharad Pawar-Bhagirath Bhalke-KCR
Sugar Factory Election :कल्याणराव काळेंची विजयी सलामी; पण सामना अटीतटीचाच, अभिजीत पाटलांच्या पॅनेलचे कडवे आव्हान

भगीरथ भालकेंच्या घोषणेनंतर मात्र राष्ट्रवादीत खळबळ उडाली. कारण, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अवघी तीन हजार मते मिळाली होती आणि उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला हेाता. त्यामुळे या मतदारसंघात भालके नावाची ताकद काय आहे, हे पक्ष चांगलाच जाणून आहे. त्यामुळेच तातडीने वरिष्ठ नेत्याने भगीरथ यांच्याशी संपर्क साधून घाई न करण्याची ताकीद दिली होती. तसेच, भेटीला येण्याची सूचनाही केली हेाती. खरं तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला दोघांनाही विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत संभाळून ठेवणे अवघड नव्हते. निवडणुकीच्या तोंडावर तोडगा काढता आला असता. मात्र, घाईने संकेत देणे राष्ट्रवादीला सध्या थोडसे अडचणीचे ठरत आहे.

Abhijeet Patil-Sharad Pawar-Bhagirath Bhalke-KCR
NCP's MLA Will Increase : होय, राष्ट्रवादीचे १० ते २० आमदार वाढतील; शिंदे गटाच्या नेत्याची कबुली

राष्ट्रवादीच्या हालचाली पाहून भगीरथ भालके यांनीही पर्याय शोधायला सुरुवात केली. मेळाव्यानंतर दोन-तीन दिवसांतच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना तेलंगणाहून खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यामुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या भालके यांना दहा हत्तीचे ‘बळ’ आले. राष्ट्रवादीची घाई ही भगीरथ भालके यांना केसीआर यांच्या दारापर्यंत घेऊन गेली आहे. आता केसीआरच्या ‘घरात’ प्रवेश करायची की निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीतही तिकिटाची वाट पहायची याचा निर्णय सर्वस्वी भगीरथ भालके यांच्या हातात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com