रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी वकिली करू; भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत : राजन पाटलांचे मोठे वक्तव्य

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा.
Ranjitsinh Mohite Patil-Rajan Patil
Ranjitsinh Mohite Patil-Rajan PatilSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्हा अगोदर राष्ट्रवादीमय (NCP) होता, तो आता कमी झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, त्याच्यासाठी आम्ही वकिली करू; कारण भाजपमध्ये (BJP) आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपले भाजपमधील वजन प्रवेशाआधीच अधोरेखित केले. (We Will discuss with BJP leaders for Ranjitsinh Mohite Patil's ministerial post: Rajan Patil)

वैमानिक झाल्याबद्दल ऋतुजा राजन पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब देशमुख, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील या तिघांचा पापरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पापरी व भोसले कुटुंबीय यांच्या वतीने पापरी (ता. मोहोळ) येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून बोलत हेाते.

Ranjitsinh Mohite Patil-Rajan Patil
'मी बोअर झालोय, मला गाणं म्हणून दाखव' : अवर सचिवाची महिला अधिकाऱ्याकडे फर्माईश!

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, आजच्या सत्कारमूर्ती या जिल्ह्याच्या प्रेरणा आहेत. ऋतुजा राजन पाटील या महिला वैमानिक झाल्याने महिलांचा स्वाभिमान वाढला आहे. जिल्ह्याच्या अडचणी सोडवण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासासाठी माहेर आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सहकार्य करू.

Ranjitsinh Mohite Patil-Rajan Patil
उपोषण स्थगित करताच शिवसेना आमदार पाटलांचा सरकारला खणखणीत इशारा

या वेळी आमदार यशवंत माने म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने मोहोळ तालुक्याचा १३० कोटींचा विकास निधी आडविला आहे, तो मिळण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न करावा.

Ranjitsinh Mohite Patil-Rajan Patil
रवी राणांसोबत चर्चा करण्याची माझी इच्छा नाही : बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा

माजी आमदार राजन पाटील म्हणाले, ‘जिल्ह्याच्या विकासात व जडणघडणीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, (स्व.) गणपतराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा.

Ranjitsinh Mohite Patil-Rajan Patil
Y+Escort Security : नार्वेकर-फडणवीस बहुत ही याराना लगता है’!

ऋतुजा पाटील म्हणाल्या, मी शाळेत असताना जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरविले. तुम्हीही तुमच्या मुलींना संधी द्या. या माझ्या स्वप्नाचे सर्व श्रेय आजी आजोबा, आई-वडील व भावांना जाते. या वेळी अजिंक्यराणा पाटील, नाना डोंगरे, प्रकाश चवरे, डॉ बाबासाहेब देशमुख, संगीता सावंत यांची भाषणे झाली. या वेळी प्रकाश कस्तुरे ,पोपट देशमुख, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत चवरे, सरपंच जयश्री शंकर कोळी, उपसरपंच अमोल भोसले, रमेश कचरे, वैभव गुंड, रामदास चवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com